गोरेगावात तरुणीवर बलात्कार

By Admin | Updated: July 28, 2014 04:12 IST2014-07-28T04:12:36+5:302014-07-28T04:12:36+5:30

गोरेगाव पूर्व येथे एका १७वर्षीय मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे.

Rape of a woman in Goregaon | गोरेगावात तरुणीवर बलात्कार

गोरेगावात तरुणीवर बलात्कार

मुंबई : गोरेगाव पूर्व येथे एका १७वर्षीय मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. गोरेगाव पूर्व येथील प्रवासी इंडस्ट्रीयल इस्टेट राजीवनगर येथे पीडित मुलीच्या ओळखीच्या मुलाने तिला लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केला.
या घटनेनंतर पीडित मुलगी गरोदर राहिल्याने तिच्या पालकांनी दिंडोशी पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
तक्रारीनंतर पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा नोंदवला असून, या प्रकरणी अधिक तपास सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष डफळे यांनी दिली. या प्रकरणानंतर आरोपी विजय हा फरार असून पोलीस त्याचा शोध
घेत आहेत. तसेच पीडित मुलीवर नायर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Rape of a woman in Goregaon