बलात्कार प्रकरण; आरोपीला दोन महिन्यांनंतर अटक

By Admin | Updated: June 10, 2016 01:39 IST2016-06-10T01:39:22+5:302016-06-10T01:39:22+5:30

दोन महिन्यांपूर्वी रायकरमळा येथील अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून फरारी झालेल्या आरोपीला पकडण्यात यवत पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाला यश आले

Rape case; The accused arrested two months later | बलात्कार प्रकरण; आरोपीला दोन महिन्यांनंतर अटक

बलात्कार प्रकरण; आरोपीला दोन महिन्यांनंतर अटक


यवत : दोन महिन्यांपूर्वी रायकरमळा येथील अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून फरारी झालेल्या आरोपीला पकडण्यात यवत पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाला यश आले आहे.
आरोपी सचिन नवनाथ शिंदे (रा. रायकरमळा, यवत) असे आरोपीचे नाव आहे. याबाबतची तक्रार एप्रिल २०१६मध्ये संबंधित पीडित मुलगी व तिच्या नातेवाइकांनी यवत पोलिसांत दिल्यानंतर याबाबत बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता. पोलीस उपनिरीक्षक पूनम पाटील या गुह्याचा तपास करीत होत्या. ७ चून रोजी यवत पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाला आरोपी सचिन शिंदे गावात येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस नाईक संदीप कदम, रणजित निकम, गणेश झरेकर, संपत खबाले यांनी आरोपी सचिन शिंदे याला पकडले.

Web Title: Rape case; The accused arrested two months later