अ‍ॅण्टॉप हिल येथे बलात्कार

By Admin | Updated: August 13, 2014 03:23 IST2014-08-13T03:23:03+5:302014-08-13T03:23:03+5:30

लग्नाचे आमिष दाखवत अ‍ॅण्टॉप हिल परिसरात राहणा-या १९ वर्षीय तरुणीवर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे

Rape in Antope Hill | अ‍ॅण्टॉप हिल येथे बलात्कार

अ‍ॅण्टॉप हिल येथे बलात्कार

मुंबई : लग्नाचे आमिष दाखवत अ‍ॅण्टॉप हिल परिसरात राहणाऱ्या १९ वर्षीय तरुणीवर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. याबाबत अ‍ॅण्टॉप हिल पोलिसांनी देवेंद्र पाटील (२३) या तरुणावर गुन्हा दाखल करीत त्याला अटक केली आहे.
कोकरी आगार परिसरात पीडित तरुणी कुटुंबीयांसमवेत राहते. आठ महिन्यांपूर्वी याच परिसरात राहणाऱ्या आरोपीसोबत तिची ओळख झाली होती. काही दिवसांतच त्यांच्या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. दरम्यान, आरोपीने लग्नाचे आमिष दाखवत अनेकदा बलात्कार केला. तिच्याकडून खोटे बोलून दागिनेही देवेंद्रने काढून घेतले. अनेकदा दागिने मागूनही त्याने ते परत केले नाहीत. या संदर्भात पोलिसांनी देवेंद्र पाटीलला अटक केली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Rape in Antope Hill