शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

रणजित पाटील यांच्या कन्येला नोटीस

By admin | Updated: October 10, 2016 20:38 IST

स्वत:ला समाजसेवक संबोधणारे विक्रांत काटे यांच्याशी संबंधित फौजदारी प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गृहराज्यमंत्री (शहर) डॉ. रणजित पाटील

ऑनलाइन लोकमतनागपूर, दि. 10 -  स्वत:ला समाजसेवक संबोधणारे विक्रांत काटे यांच्याशी संबंधित फौजदारी प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गृहराज्यमंत्री (शहर) डॉ. रणजित पाटील यांची कन्या काश्मिरा पाटील व राज्य शासनाला नोटीस बजावून १३ आॅक्टोबरपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. प्रकरणावर न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांच्यासमक्ष सुनावणी झाली.काटे यांनी, वडील डॉ. रणजित पाटील व संपूर्ण कुटुंबावर अवमानाजनक आरोप केल्याचा दावा करून काश्मिरा यांनी प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी (जेएमएफसी) न्यायालयात तक्रार दाखल केली आहे. काटे यांच्यावर कारवाई करण्याची विनंती तक्रारीत करण्यात आली आहे. जेएमएफसी न्यायालयाने या तक्रारीची दखल घेऊन सुरुवातीला याप्रकरणाची फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम २०२ अंतर्गत चौकशी करण्याचे निर्देश अकोला पोलिसांना दिलेत तर, ५ मे २०१५ रोजी काटे यांना समन्स बजावला. या आदेशाविरुद्धध काटे यांनी सत्र न्यायालयात पुनर्विचार अर्ज सादर केला होता. हा अर्ज २१ जुलै २०१६ रोजी रद्द करण्यात आला. यामुळे काटे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. जेएमएफसी न्यायालयातील प्रकरण रद्द करण्याची त्यांची विनंती आहे. काटे यांनी २०१४ मध्ये पत्रकार परिषद घेऊन डॉ. पाटील यांच्याविरुद्ध मानहानीजनक आरोप केले. निवडणूक लढविण्यासाठी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात डॉ. पाटील यांनी त्यांची कन्या जयची माहिती लपवून ठेवली. प्रतिज्ञापत्रात केवळ काश्मिरा व शर्व या दोनच अपत्यांची माहिती दिली. त्यांच्या मालमत्तेचा मोठा हिस्सा अल्पवयीन कन्या जयच्या नावावर आहे असा दावा काटे यांनी केला होता. जेएमएफसी न्यायालयात प्रलंबित तक्रारीमध्ये काटे यांचे सर्व आरोप खोडून काढण्यात आले आहेत. जय हे काश्मिरा यांचेच मूळ नाव आहे. गुमशी (ता. मूर्तिजापूर, जि. अकोला) येथील मालमत्तेवरून काटे यांचा काश्मिरा यांच्या आजोबासोबत वाद आहे. यामुळे काटे यांनी वाईट हेतूने काश्मिरा यांचे वडील डॉ. पाटील व संपूर्ण कुटुंबाचा अवमान करणारे आरोप केलेत असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.