शहरं
Join us  
Trending Stories
1
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
2
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
3
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
4
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
5
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
6
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
7
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
8
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
9
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
10
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
11
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
12
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
13
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
14
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
15
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
16
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
17
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
18
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
19
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
20
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

रामटेकच्या गडावरून कडेलोट कुणाचा? चौकसे, किरपान, मुळक यांनी वाढविले टेन्शन!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2024 16:42 IST

Maharashtra Assembly Election 2024: रामटेक विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवारांमुळे महायुती आणि महाविकास आघाडीचे उमेदवार डेंजर झोनमध्ये येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 

जितेंद्र ढवळे, नागपूर Ramtek Assembly election 2024 Explained: संकटाच्या मालिका पार करीत लोकसभेत काँग्रेसने रामटेकचा गड सर केला. मात्र १७ उमेदवार रिंगणात असलेल्या रामटेक विधानसभेत काँग्रेस बंडखोर राजेंद्र मुळक, चंद्रपाल चौकसे आणि सचिन किरपान हे तीन अपक्ष उमेदवार कुणाचा घात करणार, यावरून गावागावांतील राजकीय पारा तापला आहे.

रामटेकमध्ये सध्या चौरंगी लढत होताना दिसतेय. याचा फटका महायुतीचे (शिंदेंची शिवसेना) आशिष जयस्वाल आणि महाविकास आघाडीचे (ठाकरे शिवसेना) विशाल बरबटे यांना बसेल की, याहीवेळी अपक्षच गड सर करणार, यावरून राजकीय तर्कवितर्कही लढविले जात आहेत. मात्र प्रचाराच्या प्रारंभी अपक्षांनीही आघाडी घेतली असल्याचे चित्र आहे.

रामटेकमध्ये बंडखोरी कळीचा मुद्दा

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आशिष जयस्वाल अस्तित्वासाठी लढत असताना भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनी रामटेक सोडून दुसऱ्या मतदारसंघाकडे मोर्चा वळविला आहे. भूमिपुत्राच्या अस्तित्वाची लढाई असल्याचे सांगत युवकांची टीम घेऊन चंद्रपाल चौकसे गावागावांत पोहोचत आहेत. 

राजेंद्र मुळक रामटेकमध्ये विकासाच्या दिवाळीचा नारा देत आहेत. वंचित आघाडीने चंद्रपाल चौकसे यांना पाठिंबा दिला असून प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांनी प्रचार यंत्रणा राबविण्याचे आदेश पदाधिकारी, कार्यकर्त्यांना दिले आहेत. 

याशिवाय ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉकचे डॉ. गोवर्धन सोमदेवे, हिंदुस्थान जनता पार्टीचे पंकज मासुरकर, भीमसेनेचे प्रदीप साळवे, राष्ट्रीय गोंडवाना पार्टीचे राजेंद्र बावनकुळे, बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे विशेष वसंता फुटाणे यांच्यासह आठ अपक्ष उमेदवार रिंगणात आहेत.

आधी काय झाले आणि आता...

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने आशिष जयस्वाल यांना उमेदवारी दिल्यानंतर भाजप पदाधिकाऱ्यांनी विरोध केला. माजी आमदार डी. एम. रेड्डी यांना पक्षातून निलंबित करण्यात आले तर भाजप बंडखोर डॉ. राजेश ठाकरे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला.

महाविकास आघाडीत ही जागा उद्धवसेनेला सुटू नये यासाठी काँग्रेसचे नेते आक्रमक होते. शेवटच्या क्षणी मुळक यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४vidarbha regionविदर्भ महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ramtek-acरामटेकMahayutiमहायुतीMahavikas Aghadiमहाविकास आघाडी