मराठवाड्यात मुलाखतींदरम्यान राज ठाकरेंची प्रकृती बिघडली

By Admin | Updated: September 15, 2014 15:28 IST2014-09-15T15:21:06+5:302014-09-15T15:28:39+5:30

मराठवाड्यातील इच्छुकांच्या मुलाखतीदरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची प्रकृती बिघडल्याचे वृत्त आहे.

Raj Thackeray's condition worsened during interviews in Marathwada | मराठवाड्यात मुलाखतींदरम्यान राज ठाकरेंची प्रकृती बिघडली

मराठवाड्यात मुलाखतींदरम्यान राज ठाकरेंची प्रकृती बिघडली

>ऑनलाइन लोकमत
औरंगाबाद, दि. १५ - मराठवाड्यातील इच्छुकांच्या मुलाखतीदरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची प्रकृती बिघडल्याचे वृत्त आहे. त्यामुळे काही काळासाठी या मुलाखती थांबवण्यात आल्या असून विश्रांतीसाठी राज ठाकरे हॉटेलवर गेले आहेत.
विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे इच्छुकांच्या मुलाखती घेत असून सकाळी ११ वाजल्यापासून औरंगाबाद येथे हा कार्यक्रम सुरू होता. मात्र काही वेळानंतर ठाकरे यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांनी हॉटेलवर जाऊन विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला.
२५ सप्टेंबर रोजी राज ठाकरे त्यांची बहुप्रतिक्षित 'ब्लू प्रिंट' सादर करणार आहेत.

Web Title: Raj Thackeray's condition worsened during interviews in Marathwada