शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
6
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
7
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
8
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
9
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
10
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
11
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
12
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
13
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
14
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
15
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
16
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
17
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
18
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
19
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
20
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
Daily Top 2Weekly Top 5

विधानसभा निवडणूक लढविणार - राज ठाकरे यांची घोषणा

By admin | Updated: May 31, 2014 20:47 IST

आगामी विधानसभा निवडणूक आपण स्वत: लढविणार असल्याची घोषणा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली.

ऑनलाइन टीम 
मुंबई, दि. ३१ - आगामी विधानसभा निवडणूकीत आपण स्वत: उभा राहणार असल्याची घोषणा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली. ही घोषणा करून राज ठाकरे यांनी सर्वांनाच आर्श्चयाचा धक्का दिला. मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या सभेत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना राज यांनी ही घोषणा केली. 'या, मला आपल्याशी बोलायचंय' या मथळयाखाली मुंबईभर जाहिरातबाजी करण्यात आली होती. राज काय बोलणार याकडे अनेकांचे लक्ष होते. राज यांनी अपेक्षेप्रमाणे आश्चर्याचा धक्का देत स्व:त निवडणूक लढविणार असल्याचे सांगत कार्यकर्त्यांमध्ये आलेली मरगळ झटकण्याचा प्रयत्न केला आहे. निवडणुक लढविणारे राज ठाकरे हे ठाकरे घराण्यांतील पहिलीच व्यक्ती ठरणार आहे. महाराष्ट्रातील जनतेने आपल्यावर प्रेम दाखवले तर येणा-या काळात  विधानसभा निवडणुकीचे नेतृत्वही आपणच करणार असल्याचे सांगत मुख्यमंत्री होण्याची आपली इच्छा असल्याचेही राज यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले. 
महात्मा गांधी यांचा खरा अनुयायी कोण असेल तर तो म्हणजे राहुल गांधी आहे असे सांगत महात्मा गांधी यांच्या काँग्रेस बरखास्तीची मागणी राहुल गांधी यांनी  अंमलात आणली असा उपरोधीक टोला राज ठाकरे यांनी राहुल गांधी यांना हाणला. 
लोकसभा निवडणुकांच्या पराभवानंतर मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या सभेत राज ठाकरे बोलत होते. पराभवानंतर सभा घेणारा मनसे पहिला पक्ष आहे असे सांगून मनसेला मत देणा-यांचे राज यांनी विशेष आभार मानले. भाजपाला व त्यांच्या मित्रपक्षाला जे काही यश मिळाले ते केवळ नरेंद्र मोदी यांच्यामुळेच मिळाले आहे. मोदी यांना स्पष्ट बहुमत मिळाल्याने मोदींचे राज यांनी आभार मानले. विरोधी पक्ष जिंकत नसतो तर सत्ताधारी पक्षाचा पराभव होत असतो असे राज म्हणाले. आजची सभा ही जाहिर चिंतन करण्यासाठी आहे. चिंतन करायचे तर ते सर्वांसोबत करू त्यामुळेच ही सभा घेतली असल्याचे राज यांनी स्पष्ट केले.