शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
4
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
5
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
6
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
7
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
8
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
9
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
10
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
11
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
12
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
13
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
14
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
15
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
16
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
17
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
18
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
19
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
20
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
Daily Top 2Weekly Top 5

Raj Thackeray in Aurangabad: राज्यपालही औरंगाबादमध्ये पोहोचले! राज ठाकरेंच्याच हॉटेलमध्ये मुक्कामी; कारण काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2022 19:36 IST

Raj Thackeray and bhagat singh koshyari in Aurangabad: योगायोग की अन्य काही... राज ठाकरे आज पुण्याहून औरंगाबादकडे रवाना झाले. यावेळी वाटेत अहमदनगरजवळ त्यांच्या ताफ्यातील वाहनांचा विचित्र अपघात झाला.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची उद्या औरंगाबादमध्ये जंगी सभा असल्याने राज्यभरातून मनसेचे नेते, कार्य़कर्ते दाखल झाले आहेत. अशातच महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी देखील औरंगाबादमध्ये दाखल झाले आहेत. त्याहून महत्वाचे म्हणजे राज ठाकरे आणि कोश्यारी एकाच हॉटेलमध्ये उतरले आहेत.

राज ठाकरे आज पुण्याहून औरंगाबादकडे रवाना झाले. यावेळी वाटेत अहमदनगरजवळ त्यांच्या ताफ्यातील वाहनांचा विचित्र अपघात झाला. पहिल्या अपघातात तीन वाहने एकमेकांवर आदळली. यामध्ये दिग्दर्शक केदार शिंदे आणि अभिनेते अंकुश चौधरी यांच्या गाडीचेही मोठे नुकसान झाले. दुसऱ्या अपघातात ७-८ वाहने आदळली होती. राज हे 30 ते 40 गाड्यांचा ताफा घेऊन औरंगाबादकडे येत होते. यानंतर राज हे औरंगाबादमध्ये दाखल झाले. परंतू क्रांती चौकात रस्ता चुकले. काल रात्री राज यांचा मुलगा अमित ठाकरे देखील रस्ता चुकले होते.

दरम्यान, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी देखील औरंगाबादमध्ये दाखल झाले आहेत. केंद्रीय अर्थ राज्य मंत्री भागवत कराड यांच्या मुलगा वरुणच्या रिसेप्शनला ते आले आहेत. कराड यांच्या मुलाचे काही दिवसांपूर्वीच दिल्लीत लग्न झाले होते. त्याचे रिसेप्शन आज ठेवण्यात आले आहे. कोश्यारी राज ठाकरे उतरलेल्या हॉटेलमध्ये राहणार आहेत. राज ठाकरे देखील कराडांच्या रिसेप्शनला जाणार आहेत. 8 वाजून 30 मिनिटांनी राज ठाकरे कराड यांच्या मुलाच्या विवाह स्वागत समारंभात जाणार आहेत. 

 

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेbhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारीMNSमनसेAurangabadऔरंगाबाद