शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
3
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
4
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
5
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
6
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
7
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
8
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
9
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
10
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
11
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
12
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
13
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
14
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
15
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
16
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
17
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
18
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
19
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
20
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
Daily Top 2Weekly Top 5

राजकीय संस्कृतीच बदलून टाकण्याचा प्रयत्न, राज ठाकरे यांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2026 08:34 IST

Mumbai News: भाजप गेली दहा वर्ष पक्ष फोडत होता. आमदार, खासदार फोडत होता. राजकीय घरांमध्ये फूट पाडत होता. जाती-धर्माच्या नावाखाली माथी भडकवत होता. पण आता देशात दोन गट पाडण्यापर्यंत त्यांची मजल गेली आहे.

मुंबई - भाजप गेली दहा वर्ष पक्ष फोडत होता. आमदार, खासदार फोडत होता. राजकीय घरांमध्ये फूट पाडत होता. जाती-धर्माच्या नावाखाली माथी भडकवत होता. पण आता देशात दोन गट पाडण्यापर्यंत त्यांची मजल गेली आहे. महिला आरक्षणाला पक्षाचा पाठिंबा आहे. परंतु, त्याची ढाल करत लोकसभा मतदारसंघ पुनर्रचनेचा डाव खेळून उत्तरेचे महत्त्व वाढविण्याच्या प्रयत्नाला स्पष्ट विरोध आहे.

देशाची राजकीय संस्कृतीच बदलून टाकण्याचा हा प्रयत्न असून, याविरोधात आंदोलन उभारू, असा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केंद्र सरकारला दिला आहे. राज ठाकरे यांनी शुक्रवारी एक पत्र पोस्ट करत महिला आरक्षण व लोकसभा मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाबद्दलची भूमिका स्पष्ट केली. 

उत्तरेतील राज्यांचा संसदेतील टक्का वाढविण्याचा प्रयत्नमहाराष्ट्र, गोवा व दक्षिणेतील राज्यांची स्वतःची संस्कृती आहे. भाषा, लिपी आहे. हिंदी सक्तीच्या नावाखाली सरकारने काय केले ते पाहिले. वाढलेल्या खासदारांच्या जोरावर देशाच्या हिंदीकरणाची भीती असल्याने दक्षिणेतील राज्ये एकवटली आहेत. उत्तरेच्या ३, ४ राज्यांतील लोकांनी अन्य राज्यात हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. शिक्षण, आरोग्य, महिलांचे सक्षमीकरण करून लोकसंख्या नियंत्रणात ठेवणाऱ्या राज्यांना बर्बाद करणाऱ्या उत्तरेतील राज्यांचा संसदेतील टक्का वाढविण्याचा हा अजब न्याय कुठला, असा परखड सवालही राज यांनी पत्रातून केला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Raj Thackeray Alleges Attempt to Change Political Culture.

Web Summary : Raj Thackeray accuses BJP of dividing the nation and attempting to alter the political culture. He opposes using women's reservation to redraw constituencies, fearing increased northern influence in parliament and disadvantaging states controlling population through education and empowerment.
टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसे