शहरं
Join us  
Trending Stories
1
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
2
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
3
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
4
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
5
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
6
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
7
IPL मध्ये अडखणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी गुडन्यूज, ‘या’ सामन्यातून रोहित शर्मा करणार कमबॅक
8
त्याच हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्षांवर ४५ वर्षांपूर्वी झालेला गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, पण...
9
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
10
संरक्षण क्षेत्रात भारताची आघाडी! रशियाच्या जुन्या भागीदाराला मिळाली साथ; पुतिनही हैराण
11
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
12
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
13
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
14
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
15
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
16
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
17
माओवाद्यांकडून सशस्त्र क्रांतीचाच पुनरुच्चार! ‎'देवजी'ला ठरवले गद्दार: आत्मसमर्पण धोरणावर पत्रकातून आगपाखड 
18
हैदराबादहून चेन्नईला जाणाऱ्या चारमीनार एक्स्प्रेसला लागली आग, प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून मारल्या उड्या   
19
बैठे काम सिगारेट ओढण्याइतकेच घातक; दुर्लक्ष केल्यास आरोग्याचा निघणार ‘धूर’, कशी घ्याल काळजी? 
20
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
Daily Top 2Weekly Top 5

पावसाची चाहूल, तरीही दुष्काळाचे ढग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2015 04:32 IST

गतवर्षीचा दुष्काळ आणि गारपिटीमुळे हताश झालेला शेतकरी आभाळाकडे डोळे लावून बसलेला असतानाच राज्याच्या कृषी विभागाने त्यांच्या उरल्यसुरल्या आशेवरही पाणी फेरणारी बातमी

पुणे : गतवर्षीचा दुष्काळ आणि गारपिटीमुळे हताश झालेला शेतकरी आभाळाकडे डोळे लावून बसलेला असतानाच राज्याच्या कृषी विभागाने त्यांच्या उरल्यसुरल्या आशेवरही पाणी फेरणारी बातमी आणली आहे़ एल निनोच्या प्रभावामुळे जून, जुलै आणि आॅगस्ट अशा नेमक्या पेरणीच्या मोसमातच पाऊस ओढ देणार असल्याने राज्यावर यंदाही दुष्काळाचे गडद ढग घोंघावत आहेत.हवामान खाते, पंचांग आणि ग्रामीण भागातील घटमांडणीच्या सूत्रानुसार यंदा चांगला पाऊसकाळ असल्याचे भाकीत वर्तविण्यात आले होते़ त्या आशेवर असलेल्या बळीराजाने बी-बियाणांची तजवीज करून ठेवली होती, मात्र ऐन मृग नक्षत्राच्या तोंडावर कमी पावसाची कडू वार्ता आली आहे़ येत्या आठ ते पंधरा दिवसांत पावसाचे आगमन होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला असला तरी हा पाऊस बेभरवशाचा राहणार आहे़ त्यामुळे शेतकऱ्यांनी धूळवाफ पेरणी करताना घाई करू नये, असे आवाहन कृषी विभागाचे सल्लागार डॉ. रामचंद्र साबळे यांनी शेतकऱ्यांना दिला आहे़ यंदा मान्सूनवर ‘एल निनो’चा प्रभाव अधिक प्रमाणात दिसून येणार आहे. तो सरासरीच्या ९५ टक्के इतका असेल़ कोकण आणि मराठवाड्यात मात्र तो सर्वात कमी असेल़, असा अंदाज कृषी विभागाने ‘मॉन्सून मॉडेल’वरून काढला आहे़ साबळे यांच्या मते मराठवाड्यात ९०, कोकणात ९०.५, विदर्भात ९६, उत्तर महाराष्ट्रात ९७ व पश्चिम महाराष्ट्रात ९९.८ टक्के पावसाचा अंदाज आहे़ (प्रतिनिधी)