शहरं
Join us  
Trending Stories
1
गुरुवारी सायंकाळी तुर्की तर पहाटे हादरला चीन; पाकिस्ताननंतर त्याला साथ देणाऱ्या देशांना भूकंपाचे धक्के
2
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
3
भारतात तुर्की अन् अझरबैजानवरील बहिष्काराला वेग; ३० टक्के भारतीय पर्यटकांनी बुकिंग रद्द केले
4
आजचे राशीभविष्य १६ मे २०२५ : नोकरी - व्यवसायात लाभ प्राप्ती, कोणाच्या राशीत काय...
5
Sankashti Chaturthi 2025: 'घालीन लोटांगण' हा आरतीचा एक भाग नसून ते आहे स्वतंत्र कवन, पण कोणाचे? वाचा!
6
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
7
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
8
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
9
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
10
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
11
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
12
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
13
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
14
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
15
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
16
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
17
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
18
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
19
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
20
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही

पावसाचा तडाखा सुरूच; कोकण विभागात काही ठिकाणी रेड, तर काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2021 06:20 IST

पावसाचा तुफान मारा गुरुवारीदेखील सुरूच राहणार. रत्नागिरी जिल्ह्याला रेड अलर्ट.

ठळक मुद्देपावसाचा तुफान मारा गुरुवारीदेखील सुरूच राहणार.रत्नागिरी जिल्ह्याला रेड अलर्ट.

मुंबईसह महाराष्ट्रात बुधवारीदेखील मान्सूनचा तडाखा सुरूच होता. मंगळवारी आणि बुधवारी मुंबई शहर आणि उपनगरात मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची नोंद झाली. पावसाचा तुफान मारा गुरुवारीदेखील सुरूच राहणार असून, कोकण विभागात रत्नागिरी जिल्ह्याला रेड तर रायगड, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

मुंबईत गुरुवारी सकाळी पावसाची रिमझिम सुरू होती. दुपारी काही काळ पाऊस थांबला. सायंकाळी पुन्हा पावसाने वेग पकडला. मात्र सायंकाळी पावसाचा जोर संथ होता. पावसाची रिमझिम सुरू असतानाच एकूण चार ठिकाणी बांधकामाचा भाग कोसळला. मंगळवारी रात्री ९ वाजता माझगाव येथील जम जम मस्जिदशेजारी असलेली संरक्षक भिंत कोसळून रिझवान सय्यद हे ज्येष्ठ नागरिक किरकोळ जखमी झाले. त्यांच्यावर जे. जे. रुग्णालयात उपचार करून त्यांना घरी पाठविण्यात आले, तर एकूण १३ ठिकाणी शॉर्टसर्किटच्या घटना घडल्या. १५ ठिकाणी झाडांच्या फांद्या कोसळल्याच्या घटना घडल्या असून, गुरुवारी देखील मुंबईत मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत मराठवाड्यात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी तर काही ठिकाणी जोरदार पावसाची नोंद झाली आहे. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी जोरदार तर तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची नोंद झाली आहे.

१५ जुलै रोजी कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होईल. काही ठिकाणी जोरदार पाऊस पडेल. किनारी भागात सोसाट्याचा वारा वाहील. १६ जुलै रोजी देखील कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होईल. तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल. किनारी भागात सोसाट्याचा वारा वाहील. 

१५ मिनिटांच्या अंतराने वर्तवणार हवामान अंदाज आता २४ तासांऐवजी १५ मिनिटांच्या अंतराने हवामान अंदाज वर्तवण्याचा विचार सुरू आहे, असे केंद्रीय भूविज्ञान मंत्रालयाचे सचिव डॉ. एम. राजीवन यांनी सांगितले. हवामान अंदाजांबाबतच्या वाढीव मागण्यांची पूर्तता करण्यासाठी आवश्यक असलेले अभिप्राय जाणून घेण्याच्या उद्देशाने आयआयटीएमने पवन आणि सौरउर्जा निर्मितीसाठी ‘हवामानशास्त्रीय भाकीत : सद्यस्थिती आणि भविष्यकालीन दृष्टिकोन’ या विषयावर आयोजित केलेल्या ऑनलाइन कार्यशाळेच्या उद्घाटन सत्रामध्ये ते बोलत होते.

डॉ. एम राजीवन म्हणाले, ‘‘भारतीय उष्णकटीबंधीय हवामानशास्त्र संस्था, भारतीय हवामानशास्त्र विभाग आणि नॅशनल सेंटर फॉर मीडियम रेंज वेदर फोरकास्टिंग यांसारख्या भूविज्ञान मंत्रालयाच्या संस्था पवन आणि सौर उर्जाविषयक हवामानाचे अंदाज जारी करत असतात. विविध हितधारकांकडून वाऱ्यांचा वेग, ढगांचे आच्छादन आणि सौर किरणोत्सार लहरीच्या अंदाजांची विचारणा होत असते. ऊर्जा क्षेत्राशी संबंधित हवामान शास्त्रविषयक भाकिते आणखी अचूक करण्यासाठी भूविज्ञान मंत्रालय २०२१ ते २०२६ या नियोजन कालावधीमध्ये या भाकितांशी संबंधित विविध प्रकारच्या कामांना आणखी बळकटी देणार आहे.

नव्या, नूतनक्षम ऊर्जा स्रोतांचा वापर वाढवण्यासाठी, जीवाश्म इंधनांचा वापर कमी करण्यासाठी आवश्यक पर्यायांची चाचपणी केली जात आहे. पवन ऊर्जा स्रोतांद्वारे वीज निर्मिती करण्यासाठी हवामानाचे भाकीत महत्त्वाचे असते. ताशी १५ किमीपेक्षा कमी गतीने वारे वाहणाऱ्या आणि डोंगराळ भागात पवनऊर्जा निर्मितीसाठी हवामानाचे भाकीत अचूक असणे आवश्यक असते. सौर उर्जा निर्मितीसाठी निरभ्र आकाश असताना भाकीत करणे सोपे असते; मात्र ढगाळ वातावरण असताना सूर्यप्रकाशाबाबतचे भाकीत करणे अवघड होते, असेही त्यांनी नमूद केले.

टॅग्स :RainपाऊसMaharashtraमहाराष्ट्रkonkanकोकणRatnagiriरत्नागिरीsindhudurgसिंधुदुर्गPuneपुणेkolhapurकोल्हापूरweatherहवामान