शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
6
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
7
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
8
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
9
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
10
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
11
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
12
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
13
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
14
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
15
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
16
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
17
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
18
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
19
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
20
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
Daily Top 2Weekly Top 5

सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने रेल्वे सेवा कोलमडली

By admin | Updated: July 21, 2016 18:40 IST

सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने पुणे रेल्वे स्थानकावरील रेल्वे सेवा गुरूवारी सकाळी विस्कळीत झाली . सकाळी साडे सहा पासून ही सिग्नल यंत्रणा बारा वाजे पर्यंत तब्बल चार वेळा बंद पडली

पुणे : सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने पुणे रेल्वे स्थानकावरील रेल्वे सेवा गुरूवारी सकाळी विस्कळीत झाली . सकाळी साडे सहा पासून ही सिग्नल यंत्रणा बारा वाजे पर्यंत तब्बल चार वेळा बंद पडली. त्यामुळे पुण्याहून मुंबईकडे आणि सोलापूरकडे जाणा-या तसेच मुंबईहून पुण्याकडे येणा-या तब्बल 28 गाडया एक ते दिड तास उशीराने धावत होत्या. तर लोणावणा-पुणे मार्गावरील दोन लोकलही रद्द करण्यात आल्या. या बिघाडाचा सर्वाधिक फटका चाकरमान्यांना बसला असून लोणावळयाकडे जाणारी एक लोकल आणि डेक्कन क्वीन तसेच प्रगती एक्सप्रेस तब्बल तासभर उशीराने मुंबईकडे रवाना झाली. त्यामुळे या गाडया मुंबईतही उशीरा पोहचल्या. दरम्या, सकाळ सकाळ हा प्रकार घडल्याने रेल्वे स्थानकवार मोठी गर्दी झाली होती. त्यातच स्थानकावर गाडया थांबविण्यासाठी जागा नसल्याने तसेच प्रवाशांचा होत असलेला खोळंबा लक्षात घेऊन पारंपारीक पध्दतीने कर्मचा-यांच्या

 यंत्रणेद्वारे यातील काही गाडया धोका पत्करून रेल्वे प्रशासनाकडून मुंबईकडे रवाना करण्यात आल्या.सकाळी सहा वाजून 5 मिनिटांनी आपल्या नियमित वेळेनुसार, सिंहगड एक्सप्रेस मुंबईकडे रवाना झाल्यानंतर साडेसहा वाजता तळेगाव लोकलही रवाना झाली. ही गाडी पुढे जाताच काही क्षणाताच मुंबई तसेच सोलापूरकडे जाणारी संपूर्ण सिग्नल यंत्रणाच बंद पडली. त्यामुळे स्थानकावर अचानक सर्वच गाडया थांबविण्यात आल्या. त्यानंतर लगेच 6.50 मिनिटांनी लोणावळयाकडे जाणारी लोकल रद्द करण्यात आली. त्यानंतर कोल्हापूरहून आलेली सह्याद्री एक्सप्रेसही काही वेळ थांबविण्यात आली. त्यामुळे प्रवाशांमध्ये काहीवेळ गोंधळाची स्थिती होती. त्यानंतर लगेचच 7 वाजून 15 मिनिटांनी जाणारी डेक्कन क्वीन, 7.10 मिनिटांनी सुटणारी बारामती पँसेंजर, 7 वाजून 50 मिनिटांनी सुटणारी प्रगती एक्सप्रेसही थांबविण्यात आली. या गाडयांना प्रामुख्याने मुंबईकडे जाणा-या नोकदरांची मोठी गर्दी असते.

त्यामुळे स्थानकावर प्रचंड गर्दी झाल्याने काही काळ गोंधळही निर्माण झाला होता. दरम्यान, सिग्नल यंत्रणेच्या बिघाडाची माहिती देत प्रवाशांना सहकार्य करण्याचे आवाहनही करण़्यात आले. मात्र, त्याच गाडयांना जास्त उशीर झाल्यास अडचण निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन काही गाडया मँन्यूअली सिग्नल यंत्रणेद्वारे सोडण्यात आल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.=========================== 28 गाडयांना उशीर 2 लोकल रद्दसिग्नल यंत्रणेमधील या बिघाडाचा फटका पुणे रेल्वेस्थानकावरून जाणा-या तब्बल 28 गाडयांना बसला, त्यात प्रामुख्याने 2 लोकल, 2 पँसेंजर तसेच 22 एक्सप्रेसचा समावेश होता. यात प्रामुख्याने पुण्याहून सुटणा-या प्रगती, डेक्कन क्वीन, कामाख्या एक्सप्रेस, हजरत निजामुददीन, चेन्नई सेंट्रल , विशाखा पटटनम, गोरखपूर, भुवनेश्वर, हातीया या गाडयांनाही उशीर झाला. तर पुण्यामार्गे मुंबईकडे जाणा-या तसेच मुंबईहून पुण्याकडे येणा-या गाडयांमध्ये काकीनाडा एक्सप्रेस, यशवंतपूर, सिंकदराबाद, हैद्राबाद, कोईमंबतूर या गाडयांनाही 40 ते 45 मिनिटांचा उशीर झाला.