शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
4
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
5
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
6
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
7
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
8
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
9
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
10
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
11
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
12
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
13
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
14
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
15
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
16
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
17
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
18
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
19
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
20
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे सुरक्षा आयुक्त करणार कोकण रेल्वेमार्गाची पाहणी

By admin | Updated: June 14, 2014 04:45 IST

पावसाळ्यात कोकण रेल्वेला नैसर्गिक आपत्तींचा नेहमीच सामना करावा लागतो. प्रत्येक वर्षी कोकण रेल्वेकडून आपल्या मार्गावर पावसाळापूर्व उपाययोजना केल्या

मुंबई : पावसाळ्यात कोकण रेल्वेला नैसर्गिक आपत्तींचा नेहमीच सामना करावा लागतो. प्रत्येक वर्षी कोकण रेल्वेकडून आपल्या मार्गावर पावसाळापूर्व उपाययोजना केल्या जातात. या उपाययोजनांची पाहणी मध्य रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून पुढील आठवड्यात दोन दिवस केली जाणार आहे. पावसाळ्यात नैसर्गिक आपत्तीमुळे कोकण रेल्वेमार्गावर प्रत्येक वर्षी दरड कोसळणे, माती खचण्याच्या घटना घडतात आणि त्याचा कोकण रेल्वेला मोठा फटका बसतो. या घटना घडू नयेत यासाठी कोकण रेल्वेमार्गावर सुरक्षेचे उपाय केले जातात. उपाययोजनांवर कोकण रेल्वेने १९९९ ते एप्रिल २०१३पर्यंत एकूण २९२ कोटी ५२ लाख रुपये खर्च केले आहेत. मागील वर्षी कोकण रेल्वेने २३ कोटी रुपये खर्च केले होते; तर यंदा २०१४मध्ये जवळपास १७ कोटी रुपये खर्च करण्यात आल्याने १९९९पासून आतापर्यंत करण्यात आलेला खर्च हा ३०० कोटींपेक्षा जास्त झाला आहे. कोकण रेल्वेकडून सर्वाधिक लक्ष हे पोमेंडी, निवसर, अडवली या ठिकाणांवर दिले जाते. कोकण रेल्वेकडून नेमक्या उपाययोजना कशा केल्या आहेत, याची पाहणी मध्य रेल्वे सुरक्षा आयुक्त चेतन बक्षी करणार आहेत. पुढील आठवड्यात मंगळवार आणि बुधवारी दोन दिवस पाहणी करणार असून, त्यानंतर आपला अहवाल कोकण रेल्वेला सादर करतील. (प्रतिनिधी)