शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
4
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
5
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
6
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
7
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
8
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
9
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
10
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
11
आजचा अग्रलेख: महिला आरक्षणाचा राजकीय खेळ
12
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
13
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
14
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
15
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
16
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
17
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
18
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
19
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
20
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
Daily Top 2Weekly Top 5

बालगोविंदांचा हीरो ठरला राहुल करंडे

By admin | Updated: August 19, 2014 02:13 IST

सर्वोच्च न्यायालयानेही बालगोविंदांवरची बंदी कायम ठेवल्यानंतर बालगोविंदा दहीहंडीत दिसणार नाहीत, अशी स्थिती निर्माण झाली होती.

मनीषा म्हात्रे - मुंबई
सर्वोच्च न्यायालयानेही बालगोविंदांवरची बंदी कायम ठेवल्यानंतर बालगोविंदा दहीहंडीत दिसणार नाहीत, अशी स्थिती निर्माण झाली होती. पण 12 वर्षे पूर्ण झालेल्या आणि 13 व्या वर्षात पदार्पण केलेल्या बालगोविंदांचा शोध ‘लोकमत’नेही घ्यायचे ठरवले. असा एक बालगोविंदांचा हीरो ठरलेला 13 वर्षीय कायदेशीर एक्का आम्हाला आढळून आला, तो म्हणजे राहुल विलास करंडे. 12 वर्षाचा टप्पा ओलांडल्याने तो बालगोविंदांच्या गळ्य़ातला जणू ताईत बनला होता. 
राहुल करंडे आपल्या आईवडिलांबरोबर सायनच्या प्रतीक्षानगर येथे राहण्यास आहे. गेल्या चार वर्षापासून सायनच्या एकलव्य गोविंदा पथकातून तो दहीहंडी फोडत आहे. सायनच्याच कर्मवीर विद्यालयात तो सातवी इयत्तेत शिकतो. तिसरीत असल्यापासूनच राहुलने दहीहंडीच्या थरांवर चढण्यास सुरुवात केली. सुरुवातीला पाच थरांवर चढणारी त्याची चिमुकली पावले सातव्या थरावर पोहोचली. तर दुसरीकडे दहीहंडी उत्सवात गंमत म्हणून पाहणा:या राहुलसाठी हाच दहीहंडीचा सण मानाचा, आनंदाचा बनत गेला.  
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मात्र त्याने जोरदार जल्लोष केला. 12 वर्षाची अट त्याला लागू होत नव्हती. कारण त्याने 13 व्या वर्षात प्रवेश केलेला होता. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या दिलासादायक निर्णयामुळे मला पुन्हा दहीहंडीचा थरार अनुभवायला मिळाल्याचा आनंद वाटत असल्याची भावना त्याने ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.
 
12 वे वर्ष ओलांडलेले असल्याने तो जोशात दहीहंडी उत्सवात सामील झाला होता. बालगोविंदांचा तो जणू हीरो झाला होता. कायदेशीररीत्या मिळालेला हक्क राहुलने समरसून साजरा केला. यंदाची दहीहंडी त्याच्यासाठी खास असल्याने सकाळपासून बजरंग बलीचा जयघोष करीत मुंबईतील अनेक हंडय़ा राहुलने फोडल्या. अनेक नामांकित हंडय़ांना सलामी देत तो पुढे जाताना दिसला. गर्दीतून जाताना त्याच्या चेह:यावरील उत्कट भावच खूप काही सांगून जात होते.