शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

रेडिओलॉजिस्टचे आंदोलन पेटले

By admin | Updated: June 16, 2016 21:45 IST

रेडिओलॉजिस्टने पुकारलेल्या बंदला शहरातील कॉर्पोरेट हॉस्पिटल्सनेही गुरुवारी पाठिंबा दिला.

ऑनलाइन लोकमतपुणे, दि. 16 - रेडिओलॉजिस्टने पुकारलेल्या बंदला शहरातील कॉर्पोरेट हॉस्पिटल्सनेही गुरुवारी पाठिंबा दिला. शहरातील या सर्व हॉस्पिटलमधील इमर्जन्सी सोनोग्राफी बंद करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. त्यामुळे आजपासून ओपीडीमध्ये आलेल्या रुग्णांची सोनोग्राफी करणेही बंद केले. मात्र रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांची सोनोग्राफी आणि एक्स रे करण्याचा निर्णय आज रेडिओलॉजिस्ट असोसिएशनच्या बैठकीत घेण्यात आला.पीसीपीएनडीटी कायद्याअंतर्गत सर्वाधिक गुन्हे राज्यात पुण्यातील डॉक्टरांवर दाखल करण्यात आले आहेत. या कायद्यातील तरतुदी जाचक असून त्यात सुधारणा व्हावी अशी मागणी वारंवार केली असूनही कायद्यात बदल करण्यात येत नाही. त्यामुळे डॉक्टरांना रुग्णसेवा करणे अशक्य झाल्याने गेल्या दोन दिवसांपासून पुण्यातील सोनोग्राफी,एक्य रे सेवा बंद ठेवण्यात आल्या आहेत. या संपाला पाठिंबा देण्यासाठी कापोर्रेट हॉस्पिटल्सनेही इमर्जन्सी सोनोग्राफी बंद केल्या आहेत, अशी माहिती इंडियन्स रेडिओलॉजि अँड इमेजिंग असोसिएशनच्या पुणे शाखेचे अध्यक्ष डॉ. गुरूराज लच्छान यांनी दिली.रेडिओलॉजिस्टच्या संपाला आयएमए, अस्थिरोग तज्ज्ञ संघटना, भूलतज्ज्ञ ांची संघटना आणि शहरातील स्त्री रोग व प्रसूती तज्ज्ञांनी उत्स्फूर्तपणे पाठिंबा दिल्याचेही त्यांनी सांगितले.गुरुवारी झालेल्या या बैठकीला शहरातील सर्व कार्पोरेट हॉस्पिटल्सचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. पुण्यात सुरू असलेल्या रेडिओलॉजिस्टच्या संपाचा आज तिसरा दिवस होता. सोमवारपर्यंत या कोंडीतून मार्ग निघाला नाही तर पुन्हा राज्यव्यापी बंद पुकारण्याचा इशाराही डॉ. लच्छान यांनी दिला.