शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
2
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
3
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
4
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
5
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
6
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
7
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
8
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
9
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
10
वि. स. खांडेकर ते सिमोन डी बोवॉयर... सगळे हुतात्मा चौकातील फुटपाथवर..!
11
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
12
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
13
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
14
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
15
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
16
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
17
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
18
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
19
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
20
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
Daily Top 2Weekly Top 5

शेकाप राज्यात 35 जागा लढविणार!

By admin | Updated: August 2, 2014 22:47 IST

शेतकरी कामगार पक्ष महाराष्ट्रात किमान 35 जागा लढविणार असल्याचे संकेत आज शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी कामोठे येथे दिले.

पनवेल : देशात सत्तास्थानी बसलेल्या भारतीय जनता पक्षाने व शिवसेनेने आधी सीमा प्रश्न सोडवून दाखवावा, मगच मते मागण्यासाठी यावे असे आव्हान देत शेतकरी कामगार पक्ष महाराष्ट्रात किमान 35 जागा लढविणार असल्याचे संकेत आज शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी कामोठे येथे दिले.
शेतकरी कामगार पक्षाच्या 67 व्या वर्धापनदिनानिमित्त कामोठे येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात आमदार जयंत पाटील बोलत होते. राज्यात येऊ घातलेल्या निवडणुकीत भाजपा, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी पक्षाने युती आघाडी न करता हिंमत असेल तर एकएकटे लढून दाखवावे, मग आम्हीही आमची ताकद दाखवून देऊ, असे थेट आव्हानही त्यांनी यावेळी दिले. आजर्पयत शेकापचे अनेक नेते पक्ष सोडून गेले परंतु शेकापचा निष्ठावान कार्यकर्ता मात्र कुठेच गेला नाही म्हणूनच आजर्पयत कितीही लाटा आल्या तरीही पक्षाचा लाल बावटा डौलाने फडकत राहिला आहे.
ते म्हणाले की, या देशात आता काँग्रेस वाढू शकत नाही कारण त्यांच्याकडे आता नेतृत्व राहीले नाही. त्याचप्रमाणो भाजपा - शिवसेना देखील काँग्रेस विरोधात लढू शकत नसल्याने काँग्रेस विरोधी मतदारांना शेतकरी कामगार पक्ष हाच तिसरा पर्याय असल्याचे त्यांना समजले आहे. येत्या पंधरा ऑगस्टनंतर शेतकरी कामगार पक्ष आपले सर्व उमेदवार जाहीर करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
आमदार विवेक पाटील यावेळी म्हणाले की, पनवेलच्या रस्त्यांप्रमाणोच स्थानिक काँग्रेसलाही खड्डे पडले आहेत. काँग्रेस - राष्ट्रवादी ढेपाळली आहे तर शिवसेना - भाजपा हवेत आहेत. बदलते पनवेल बहरते पनवेल या खोटय़ा जाहीराती पाहून कोणीही पनवेलमध्ये येण्याचे धाडस करु नका, कारण पनवेलच्या रस्त्यावरुन फिरताना तुमची गाडी पंर होईल व कंबर मोडल्याशिवाय राहणार नाही, अशी टीका यावेळी त्यांनी केली.
शेकापचे पनवेल विधानसभा मतदार संघाचे उमेदवार व जिल्हाचिटणीस बाळाराम पाटील यांनी लोकसभा निवडणुकीत मोदी लाट असतानाही उरण व पनवेल मतदार संघात शेकापने आघाडी घेऊन शेकापचा निष्ठावान कार्यकर्ता काय करु शकतो हे दाखवून दिल्याचे सांगितले. शेकापची आंदोलने ही केवळ ढोंगबाजी नसते तर जनतेच्या  प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी असतात. मतदारांचा कौल हा काँग्रेस विरोधी असून येत्या विधानसभेत काँग्रेस आघाडीला तख्तावरुन खाली खेचण्यासाठी व शेकापचा खटारा विधानसभेत पोहचविण्यासाठी कामाला लागा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
याप्रसंगी व्यासपीठावर आमदार मिनाक्षी पाटील, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष पंडित पाटील, माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे, अलिबागचे नगराध्यक्ष प्रशांत नाईक, तालुका चिटणीस नारायण घरत, पनवेल विधानसभा मतदार संघ अध्यक्ष काशीनाथ पाटील, राज्य प्रवक्ते मल्लीनाथ गायकवाड, आंबेजोगाईचे नगरसेवक डॉ. राजेश इंगोले, जतचे बबन शिंगाडे, बिड जिल्हा चिटणीस मोहन गुंड, शेकापचे जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक, पदाधिकारी आदि उपस्थित होते. सुरुवातीला दत्तुशेठ पाटील व मोहन पाटील यांना आदरांजली वाहिली.