शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

भूमिपूजनापासून सेनेला ठेवले दूर

By admin | Updated: October 9, 2015 01:54 IST

इंदू मिलच्या जमिनीवर उभ्या राहणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या भूमिपूजन समारंभापासून शिवसेनेला दूर ठेवण्याची खेळी भाजपाने खेळली आहे. यामुळे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे

मुंबई : इंदू मिलच्या जमिनीवर उभ्या राहणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या भूमिपूजन समारंभापासून शिवसेनेला दूर ठेवण्याची खेळी भाजपाने खेळली आहे. यामुळे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होणाऱ्या मेट्रो रेल्वेच्या कार्यक्रमाला हजर न राहता, बीडला जाण्याचा निर्णय घेतला असल्याचे समजते.राज्यात शिवशक्ती-भीमशक्तीची कल्पना सर्वप्रथम दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मांडली होती. त्यामुळे रामदास आठवले यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीची साथ सोडून शिवसेना-भाजपा युतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला. मात्र, ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपाने महायुतीत फूट पाडून आठवले यांच्या रिपाइंला आपल्यासोबत घेऊन शिवसेनेला एकटे पाडले होते. आता इंदू मिलच्या कार्यक्रमापासून शिवसेनेला दूर ठेवत, या स्मारकाचे श्रेय शिवसेनेला मिळू न देण्याची खेळी केली गेली आहे.इंदू मिलच्या भूमिपूजन समारंभाच्या कार्यक्रमाला पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व रिपाइं नेते आठवले हजर राहणार आहेत. या कार्यक्रमाला केंद्र व राज्य सरकारमधील घटकपक्ष या नात्याने उद्धव यांना बोलावण्यात येईल, अशी शिवसेनेची अपेक्षा होती. मात्र, येणारी महापालिका निवडणूक लक्षात घेऊन ठाकरे यांना टाळले गेले असावे. त्यामुळे एमएमआरडीए मैदानावर होणाऱ्या मेट्रो रेल्वेच्या भूमिपूजन कार्यक्रमाला हजर न राहण्याचे ठाकरे यांनी ठरवले आहे. याबाबत एमएमआरडीएच्या जनसंपर्क विभागाकडे चौकशी केली असता, शुक्रवारी सकाळी कार्यक्रमाचे निमंत्रण उद्धव ठाकरे यांना दिले जाईल, असे सांगण्यात आले. मात्र, इंदू मिलमध्ये होणाऱ्या कार्यक्रमाचे निमंत्रण ठाकरे यांना देण्यात आल नसल्याचे समजते. याबाबत शिवसेनेचे प्रवक्ते हर्षल प्रधान म्हणाले, ‘उद्धव ठाकरे यांनी आपल्या छायाचित्रांचे प्रदर्शन भरवून त्याद्वारे जो निधी उभा राहिला, त्यातून रविवारी बीडमधील शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता ते जाणार आहेत.’ राज्यात भाजपाच्या नेतृत्वाखाली सरकार आले व देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी वानखेडे स्टेडियमवर आयोजित केला होता, पण या शपथविधी सोहळ््याचेही निमंत्रण उद्धव यांना मिळाले नव्हते. त्यामुळे ते या सोहळ््याला हजर राहणार नाहीत, असे सांगण्यात आले, पण अरुण जेटली यांनी दूरध्वनी केल्यामुळे उद्धव अगदी ऐनवेळी वानखेडेवर सहकुटुंब दाखल झाले होते. आताही ते भाजपाच्या एखाद्या वरिष्ठ नेत्याचा फोन आल्यास कार्यक्रमाला जाणार का, हा प्रश्न अनुत्तरीत आहे.