शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
4
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
5
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
6
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
7
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
8
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
9
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
10
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
11
आजचा अग्रलेख: महिला आरक्षणाचा राजकीय खेळ
12
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
13
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
14
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
15
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
16
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
17
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
18
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
19
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
20
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
Daily Top 2Weekly Top 5

लागला टकळा पंढरीचा!

By admin | Updated: June 20, 2014 22:38 IST

श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे उद्या (शनिवारी) सकाळी सहाला आजोळघरातून पंढरीकडे प्रस्थान होईल.

शेलपिंपळगाव / आळंदी  : श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे उद्या (शनिवारी) सकाळी सहाला आजोळघरातून पंढरीकडे प्रस्थान होईल. प्रस्थानापूर्वी शनिवारी पहाटे एक वाजता माऊलींच्या पादुकांना रुद्राभिषेक करण्यात येणार असून, नंतर पंचामृत पूजा, पंचपक्वान्न नैवेद्य, आरती व पसायदान घेतले जाणार आहे.
ज्ञानेश्वरमहाराजांचा आषाढी पायीवारी पालखी प्रस्थान सोहळा लाखो वैष्णवांसह आजपासून पंढरीच्या वाटेवर निघणार आहे. रात्नी उशिरा आजोळघरात विसावलेल्या या सोहळ्यातील माऊलींच्या पादुकांचे लाखो वारक:यांनी अगदी सहज व सुलभ दर्शन घेतले. माऊलींच्या दर्शनसाठी रात्नीपासूनच लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
धन्य आज संत दशर्नाचा !
अनंत जन्मीचा शीण गेला !!
मज वाटे त्यांशी आलिंगन द्यावे !
कदा न सोडावे चरण त्यांचे !!
अशीच भावना प्रत्येक वारक:यांमध्ये दिसत होती. संपूर्ण अलंकापुरी चैतन्यमय, धार्मिक वातावरणात दंग झाली आहे. वारक:यांच्या संख्येत अजूनही वाढ होत आहे. शनिवारी पहाटे साडेपाच वाजता परंपरेनुसार शितोळे सरकारांचा माऊलींच्या पालखीला नैवेद्य दाखविला जाईल. पावणोसहाच्या दरम्यान शितोळे सरकारांचे अश्व आजोळघरी आणले जाणार असून, गांधीवाडय़ात त्यांना मानपान दिले जाईल. त्यानंतर माऊलींची पालखी आळंदी ग्रामस्थ व मानकरी खांद्यावर घेऊन नगरपालिकेसमोर सजविलेल्या रथात विराजमान करतील. वाजतगाजत पालखी सोहळा पुढे धाकटय़ा पादुका व नंतर साई मंदिरासमोर थोरल्या पादुकांशेजारी जाऊन विसावा घेईल. या ठिकाणी देवाची आरती होईल. आरतीनंतर पालखी पुण्याकडे मार्गस्थ होईल. नवमी व दशमीला हा सोहळा पुण्यात भवानी पेठेत, तर एकादशीला सासवड या ठिकाणी मुक्काम करेल.
 
माऊलींचे आजोळघर..
 माऊलींचे आजोळघर पूर्वी गोसावी यांचा वाडा होता. त्यांच्याकडून हा वाडा श्रीपाद गांधी यांनी खरेदी केला. पूर्वी पालखीचे प्रस्थान ज्येष्ठ वैद्य नवमीला होत असे; परंतु कधी कधी सलग दोन नवम्या येत असल्याने सोहळा प्रस्थानानंतर माउलींची पालखी ठेवायची कोठे? असा पेच निर्माण होई. हा पेच सोडविण्यासाठी माऊलींची पालखी मंदिराशेजारील गांधीवाडय़ात ठेवण्यात येऊ लागली. पुढे हीच प्रथा रूढ झाली. कालांतराने याच वाडय़ाला ‘माऊलींचे आजोळघर’ संबोधले जाऊ लागले. गांधीवाडय़ात माऊली आल्यानंतर त्यांच्या सर्व सेवेचा मान याच घरण्याकडे देण्यात आला. आजही ही परंपरा सुरू आहे.