जशोदाबेन यांना गुजरात पोलिसांचे संरक्षण

By Admin | Updated: May 31, 2014 23:16 IST2014-05-31T23:16:32+5:302014-05-31T23:16:32+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन यांना 24 तास गुजरात पोलिसांचे संरक्षण देण्यात आले आहे.

Protection of Gujarat Police by Jashodaben | जशोदाबेन यांना गुजरात पोलिसांचे संरक्षण

जशोदाबेन यांना गुजरात पोलिसांचे संरक्षण

>अहमदाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन यांना 24 तास गुजरात पोलिसांचे संरक्षण देण्यात आले आहे. पंतप्रधानांच्या पत्नी म्हणून त्यांना‘एसपीजी’चे विशेष सुरक्षा कवच दिले जाऊ शकते मात्र तशा संरक्षणाची गरज नसल्याने त्यांना गुजरात पोलिसांचे संरक्षण देण्यात आले आहे.
निवृत्त शिक्षक असलेल्या जशोदाबेन या मेहसाणा जिल्ह्यातील ब्राम्हणवाडा या खेडय़ात राहतात. त्यांना चार बिनहत्त्यारी आणि एक हत्त्यारी पोलिसांचे संरक्षण देण्यात आले आहे. हे संरक्षण 24 तास उपलब्ध राहणार आहे. यामुळे संरक्षण मिळणा:या त्या मोदी परिवाराच्या पहिल्या सदस्य आहेत.  (वृत्तसंस्था)
 

Web Title: Protection of Gujarat Police by Jashodaben