शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

३२२ कोटींचा प्रकल्प पोहोचला ४१९ कोटींवर

By admin | Updated: July 22, 2014 00:52 IST

बुडित क्षेत्रातील सिंचनासाठी उभारण्यात येणारा महत्वाकांक्षी डेहणी उपसा सिंचन प्रकल्प सध्या वेगवेगळ्या कारणांनी गाजत आहे. सहा वेळा मुदतवाढ देऊनही प्रकल्प पूर्णत्वास गेला नाही. परिणामी ३२२ कोटींचा

सहा वेळा मुदतवाढ : यवतमाळ जिल्ह्यातील डेहणी उपसा सिंचन प्रकल्प सतीश येटरे - यवतमाळ बुडित क्षेत्रातील सिंचनासाठी उभारण्यात येणारा महत्वाकांक्षी डेहणी उपसा सिंचन प्रकल्प सध्या वेगवेगळ्या कारणांनी गाजत आहे. सहा वेळा मुदतवाढ देऊनही प्रकल्प पूर्णत्वास गेला नाही. परिणामी ३२२ कोटींचा प्रकल्प तब्बल ४१९ कोटींवर जाऊन पोहोचला आहे. कंत्राटदारांची दिरंगाई आणि अधिकाऱ्यांचे आर्थिक हितसंबंध यात शेतकऱ्यांच्या सिंचनाचे स्वप्न धुळीस मिळत आहे. शासनाचा कोट्यवधीचा निधीही पाण्यात जात आहे. बाभूळगाव तालुक्यात सिंचनासाठी कोट्यवधींचा खर्च करून बेंबळा धरण निर्माण करण्यात आले. धरणाच्या वरच्या भागाला सिंचनासाठी पाणी पोहोचत नव्हते. त्यामुळे इस्त्रायलच्या धर्तीवर डेहणी उपसा सिंचन (लिफ्ट इरिगेशन) या महत्वाकांक्षी प्रकल्पाला शासनाने मंजुरी दिली. १९ जानेवारी २००७ ला या प्रकल्पाचे कंत्राट आयव्हीआरसीएल या कंपनीला देण्यात आले. प्रारंभी पहिल्या टप्प्यातील कामासाठी १९३.३६ कोटी आणि दुसऱ्या टप्प्यातील कामासाठी १२८.८३ असे एकूण ३२२.१९ कोटींचे कंत्राट संबंधित कंपनीला देण्यात आले. हे काम २४ महिन्यात म्हणजेच ९ जानेवारी २००९ पर्यंत पूर्ण करायचे होते. तशी हमीही त्यांनी करारपत्रात दिली होती. दरम्यान] कंपनीने शासनाकडून या प्रकल्पासाठी वेळोवेळी दिलेल्या निधीतून केवळ साहित्य आणि अन्य बाबींचेच काम केले. ९ जानेवारी २००९ ते ३१ मार्च २०१३ पर्यंत कंत्राटदार कंपनीशी साटेलाटे असलेल्या अभियंत्यांनी हे काम करण्यासाठी त्यांना पाच वेळा मुदतवाढ दिली. विशेष असे की, निर्धारित मुदतीत कंत्राटदार कंपनीने काम पूर्ण केले नाही तर दिवसाप्रमाणे दंड लावण्याचे प्रावधान आहे. मात्र आर्थिक हितसंबंधातून तसे होऊ शकले नाही. या प्रकल्पाला नुकतीच सहाव्यांदा एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली. प्रत्येक वेळी मुदतवाढ देण्याबरोबरच कंपनीला साहित्याची मूल्य वाढ देखील देण्यात आली. त्यातून शासनाचे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे.