शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
6
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
7
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
8
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
9
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
10
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
11
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
12
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
13
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
14
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
15
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
16
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
17
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
18
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
19
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
20
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
Daily Top 2Weekly Top 5

खासगी पार्ट्यांनाही परवानगी आवश्यक

By admin | Updated: December 30, 2014 02:26 IST

नववर्षाच्या स्वागतासाठी नागरिकांची लगबग सुरू झाली असून, ३१ डिसेंबरचा दिवस कसा साजरा करायचा याचेही प्लॅनिंग झाले आहे.

थर्टी फर्स्टच्या जल्लोषावर नजर : पार्ट्या, हॉटेल, रेस्टॉरंटची होणार तपासणीपुणे : नववर्षाच्या स्वागतासाठी नागरिकांची लगबग सुरू झाली असून, ३१ डिसेंबरचा दिवस कसा साजरा करायचा याचेही प्लॅनिंग झाले आहे. मात्र खासगी पार्ट्या करीत असाल तर तुम्हाला अन्न आणि औषध प्रशासनाचा (एफडीए) एक दिवसाचा परवाना आवश्यक आहे. भोजन तयार करण्याची जबाबदारीदेखील परवानाधारक केटररलाच द्यावी लागेल अन्यथा अशा पार्ट्यांवर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती एफडीएचे सहआयुक्त शशिकांत केकरे यांनी दिली. नववर्षाच्या स्वागतासाठी विशेष पार्ट्या आयोजित करण्याचे प्रकार गेल्या काही वर्षांत वाढले आहेत. तसेच मित्र-परिवारासह शहर हद्दीलगत अथवा एखाद्या खासगी ठिकाणीही मेजवाणीचे आयोजन करण्यात येते. शिवाय नागरिक घरगुती मेजवानीही आयोजित करीत असतात. यासाठी केक, पाव असे बेकरी पदार्थ मोठ्या प्रमाणावर खरेदी केले जातात. विविध प्रकारच्या चॉकलेटचीदेखील यादरम्यान मोठ्या प्रमाणावर विक्री होते. नागरिकांना मिळणारे खाद्यपदार्थ दर्जेदार असावेत यासाठी एफडीएने नाताळ व नववर्षाच्या पार्श्वभूमीवर अन्नपदार्थ तपासणी मोहीम हाती घेतली आहे.केटरर्सला कंत्राट दिल्यास परवाना गरजेचाएखाद्या ठिकाणी खासगी पार्टीसाठी एकत्र जमून मेजवाणीचा बेत असेल तर नागरिकांनी एक दिवसाचा परवाना घ्यावा. छायाचित्र असलेले ओळखपत्र, दोन फोटो व १०० रुपये फी भरल्यास लगेच परवाना देण्यात येतो. त्यासाठी नागरिकांनी एफडीएच्या कार्यालयाशी संपर्क साधावा. एखाद्या केटरर्सला मेजवानीचे कंत्राट दिले असेल तर तो परवानाधारक असल्याची नागरिकांनी खात्री करावी. - शिवकुमार कोडगिरे, सहआयुक्त, एफडीए