समीरच्या ठाण्यातील खोलीवर छापा

By Admin | Updated: September 23, 2015 00:44 IST2015-09-23T00:44:53+5:302015-09-23T00:44:53+5:30

कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या समीर गायकवाड राहत असलेल्या ठाण्यातील एका खोलीवर कोल्हापूर पोलिसांनी मंगळवारी सकाळी छापा टाकला.

Printed in the Thane's Thane Room | समीरच्या ठाण्यातील खोलीवर छापा

समीरच्या ठाण्यातील खोलीवर छापा

कोल्हापूर : कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या समीर गायकवाड राहत असलेल्या ठाण्यातील एका खोलीवर कोल्हापूर पोलिसांनी मंगळवारी सकाळी छापा टाकला. त्यात सनातन संस्थेची कागदपत्रे तसेच पुस्तके
आदी दोन बॅगा भरून साहित्य
मिळाले.
समीरच्या प्रेयसीकडे पोलिसांनी चौकशी केल्यानंतर अनेक गोष्टी उघड झाल्या. तिने तपासात पूर्णत: सहकार्य केल्याने तिला दररोज पोलीस अधीक्षक कार्यालयात आणले जाते, सायंकाळी इचलकरंजीतील नातेवाईकांच्या घरी सोडले जाते.
सुरुवातीला समीरने ठाण्यातील त्याच्या ठावठिकाणाबद्दल उडवा-उडवीची उत्तरे दिली. सोमवारी मध्यरात्री त्याला पोलिसी ‘खाक्या’ दाखविल्यानंतर त्याने वास्तव्याची माहिती दिल्याचे समजते.
फॉरेन्सिकचे पथक कोल्हापुरात
आरोपी समीर तपासकामात पोलिसांना अपेक्षित सहकार्य करत नसल्याने त्याचे मोबाईल कॉलचे व्हाईस रेकॉर्डिंग तपासण्यासाठी गुजरातमधील गांधीनगर फॉरेन्सिक लॅबच्या तीन सदस्यांचे पथक मंगळवारी दुपारी कोल्हापुरात दाखल झाले.

Web Title: Printed in the Thane's Thane Room