शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
3
नराधम अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
4
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
5
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दशहत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
6
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
7
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
8
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
9
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
10
सांगली हादरली! पत्नीला घरात ठेवण्याच्या हट्टापायी आईची हत्या; वडील घरी नसताना मुलाचे क्रूर कृत्य
11
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
12
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
13
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
14
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
15
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला आमरसपुरीचे जेवण आणि पितरांना ठेवतात नैवेद्य; काय आहे प्रथा? वाचा 
16
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
17
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
18
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
19
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
20
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे विदेश दौरे फायद्याचेच

By admin | Updated: September 27, 2015 05:34 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विदेश दौऱ्यांवरील टीका कानावर पडते. परंतु प्रत्यक्षात त्यांच्या या दौऱ्यांमुळे जागतिकस्तरावर भारताची प्रतिमा उंचावते आहे.

नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विदेश दौऱ्यांवरील टीका कानावर पडते. परंतु प्रत्यक्षात त्यांच्या या दौऱ्यांमुळे जागतिकस्तरावर भारताची प्रतिमा उंचावते आहे. विविध करारांमधून विदेशी गुंतवणूक देशात येण्यासंदर्भातील मार्ग मोकळे होत आहेत, या शब्दात प्रसिद्ध उद्योगपती राहुल बजाज यांनी मोदी यांच्या कार्यप्रणालीला ‘अ’ दर्जा दिला आहे.काही आठवड्यांपूर्वी बजाज यांनी मोदी सरकारवर टीकेची झोड उठवली होती, हे विशेष. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या कोनशिला सोहळ्याला आले असताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. विकास लगेच होत नसतो. त्यामुळे ‘अच्छे दिन’ लगेच येणार नाहीत. गेल्या १६ महिन्यांत केंद्र सरकारकडून आश्वासक कामगिरी झाली आहे. उद्योगक्षेत्रात सकारात्मक वातावरण निर्माण होत आहे व हे देशासाठी सकारात्मक संकेत आहेत. १६ महिन्यांत सरकारच्या कामकाजाचे मूल्यांकन करणे योग्य होणार नाही. त्यामुळे वेळ दिला पाहिजे, असे मत बजाज यांनी व्यक्त केले. केंद्र शासनातील बहुतांश मंत्री चांगले काम करीत आहेत. परंतु मंत्रिमंडळात काही फेरबदल आवश्यक वाटत असून, बिहार विधानसभा निवडणुकानंतर नव्या व अभ्यासू चेहऱ्यांना संधी देण्याची गरज असल्याचेही ते म्हणाले. १९९० नंतर मुंबईत काही उद्योगपतींनी एकत्र येत देशातील उद्योगांना डोळ्यासमोर ठेवून त्यांच्या विकासाचा आराखडा तयार केला होता. पंतप्रधानांचा ‘मेक इन इंडिया’ हा उपक्रम हे त्याचेच स्वरूप असल्याचे बजाज यांनी सांगितले.------सत्ताधारी-विरोधकांनी ‘जीएसटी’साठी एकत्र यावेदेशाच्या उद्योगक्षेत्राचा विकास लक्षात घेता ‘जीएसटी’ (गुडस् अ‍ॅन्ड सर्व्हिसेस टॅक्स) विधेयकाला लवकरात लवकर मंजुरी मिळणे आवश्यक आहे. देशहित लक्षात घेता विरोधक व सत्ताधारी यांनी एकत्र येणे आवश्यक आहे. ‘संपुआ’च्या (संयुक्त पुरोगामी आघाडी) काळात ‘जीएसटी’ला ‘रालोआ’ने (राष्ट्रीय लोकशाही आघाडी) विरोध केला होता. आता ‘संपुआ’कडून विरोध करण्यात येत आहे. देशाला विकास अपेक्षित आहे. त्यामुळे चांगल्या कामांसाठी राजकारण दूर सारण्याची गरज असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले. (प्रतिनिधी)