शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
3
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
4
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
5
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
6
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
7
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
8
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
9
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
10
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
11
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
12
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
13
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
14
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
15
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
16
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
17
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
18
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
19
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
20
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
Daily Top 2Weekly Top 5

भूमीपूत्रांना रोजगारात प्राधान्य - नरेंद्र मोदींचे आश्वासन

By admin | Updated: August 16, 2014 15:00 IST

जेएनपीटी सेझच्या माध्यमातून निर्माण होणा-या रोजगारात भूमीपूत्रांना प्राधान्य देण्यात येईल असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिले

ऑनलाइन टीम
उरण, दि. १६ - जेएनपीटी सेझच्या माध्यमातून निर्माण होणा-या रोजगारात भूमीपूत्रांना प्राधान्य देण्यात येईल असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिले. उरण येथे उभारण्यात येणा-या देशातील पहिल्यावहिल्या बंदरावर आधारित सेझ प्रकल्पाची पायाभरणी पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आली. त्यावेळी बोलताना स्थानिक भूमीपूत्रांना रोजगार  मिळावा हाच या प्रकल्पामागे एकमेव उद्देश असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. यावेळी केंद्रीय जहाज बांधणी, रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, राज्यपाल के. शंकरनारायणन, विनोद तावडे, एकनाथ खडसे आदी नेते उपस्थित होते.  
या समारंभात मोदी म्हणाले, 'पंतप्रधान झाल्यावर महाराष्ट्रातील आपला हा पहिलाच सार्वजनिक कार्यक्रम असून तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची राजधानी असणा-या रायगडमध्ये होत आहे, हे मी माझे भाग्य समजतो.' यावेळी त्यांनी छत्रपती शिवरायांचा त्रिवार जयजयकारही केला. त्यानंतर प्रकल्पग्रस्तांना भूखंडाचे वितरणही करण्यात आले.
उरणजवळील करळ गाव ते दास्तानदरम्यानच्या २७७ हेक्टर (६८४ एकर) जागेवर सेझची उभारणी करण्यात येणार आहे. जेएनपीटीत दोन टप्प्यांत सेझची उभारणी केली जाणार असून, पहिल्या टप्प्यात तीन हजार कोटी, तर दुसऱ्या टप्प्यात चार हजार कोटींची गुंतवणूक केली जाणार आहे.