शहरं
Join us  
Trending Stories
1
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
2
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
4
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
5
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
6
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
7
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
8
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
9
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
10
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
11
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
12
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
13
लहान वयात मोठी व्याधी! ४ ते ८ वर्षे वयोगटातील मुलांमध्ये वाढतोय आता ‘किडनी स्टोन’चा धोका 
14
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
15
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
16
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
17
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
18
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
19
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
20
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधान परदेशात चेकबुक घेऊन फिरतात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2015 01:42 IST

अन्य राष्ट्रांचे नेते परदेशात आपल्या तंत्रज्ञानाची मार्केटिंग करत असताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परदेशात खरेदीचा धडाका लावला आहे.

खडे बोल : पृथ्वीराज चव्हाण यांची नरेंद्र मोदींवर टीकानाशिक : अन्य राष्ट्रांचे नेते परदेशात आपल्या तंत्रज्ञानाची मार्केटिंग करत असताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परदेशात खरेदीचा धडाका लावला आहे. ते परदेशात चेकबुकच खिशात घेऊन फिरत असल्याची टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. एका व्याख्यानासाठी नाशिकमध्ये आले असता, पत्रकारांशी बोलताना चव्हाण यांनी नरेंद्र मोदींचा कारभार आशावादी वाटत नसल्याचे सांगितले. केंद्र सरकार हे एकसंघ म्हणून काम करीत नसून, सर्वत्र मोदींची एकाधिकारशाही सुरू आहे. नियोजन आयोगासारखी सरकारची ‘थिंक टँक’ असलेली संस्था मोदींनी बरखास्त केली. उद्योगांकडे लक्ष देण्यास त्यांना वेळ नाही. विज्ञान व तंत्रज्ञानातील गुंतवणूक प्रचंड वाढवणे गरजेचे असताना, मोदींना फक्त परराष्ट्र धोरणातच रस आहे. परदेशात जाताना ते खिशात चेकबुक घेऊनच फिरतात. फ्रान्सकडून केलेली राफेल विमानांची खरेदी असो की, चीनशी अब्जावधी डॉलर्सचे करार असोत, मोदी फक्त वाटायला निघाले आहेत. देशातील परकीय गुंतवणुकीतही वाढ झाली नसल्याने ‘मेक इन इंडिया’चा फुगा फुटला आहे, अशा शब्दांत त्यांनी तोफ डागली. नरेंद्र मोदी हे अद्यापही स्वत:ला गुजरातचे मुख्यमंत्रीच समजत असून, त्यामुळे महाराष्ट्राचे उद्योग गुजरातकडे पळविले जात असल्याचा आरोपही चव्हाण यांनी केला. (प्रतिनिधी)अवैज्ञानिक पंतप्रधान : चव्हाण यांनी मोदींच्या अवैज्ञानिक दृष्टिकोनावर टीका केली. विज्ञान-तंत्रज्ञानात देश आधीच पिछाडीवर असताना, मोदींसारखा देशाचा प्रमुखच अवैज्ञानिक विधाने करीत आहे. हत्तीचे शिर माणसाला लावून गणपती तयार करणे हा प्लास्टिक सर्जरीचा प्रकार असल्याचे, भारतात पुराणकाळात विमाने तयार झाल्याचे दावे त्यांनी वैज्ञानिकांसमोर केले. हा अंधश्रद्धेचा प्रकार असून, असेच सुरू राहिले तर देश कधीच वैज्ञानिक नेतृत्व करू शकणार नाही, असेही ते म्हणाले.