शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

प्रीतीचा जबाब सोमवारी?

By admin | Updated: June 21, 2014 01:51 IST

पुरवणी जबाब नोंदविण्यासाठी प्रीती लॉस एन्जेलीसहून मुंबईला येण्यासाठी निघाल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे.

मुंबई : पुरवणी जबाब नोंदविण्यासाठी प्रीती लॉस एन्जेलीसहून मुंबईला येण्यासाठी निघाल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. त्यानुसार मरिनड्राइव्ह पोलीस रविवारी संध्याकाळी किंवा सोमवारी सकाळी प्रीतीचा पुरवणी जबाब नोंदविण्याची शक्यता आहे. पोलीस उपायुक्त रवींद्र शिसवे यांनी प्रीती आज प्रवास सुरू करेल या वृत्ताला दुजोरा दिला.
पुरवणी जबाब नोंदविताना मरिनड्राइव्ह पोलीस प्रामुख्याने 3क् मे रोजी वानखेडे स्टेडियममध्ये तीन टप्प्यांमध्ये घडलेला प्रसंग प्रीतीकडून तपशीलवार समजावून घेणार आहेत. तसेच प्रत्येक घटना कधी घडली, घटना घडली तेव्हा आजूबाजूला कोण कोण उपस्थित होते हेही जाणून घेणार आहेत. याशिवाय 3क् मे रोजी ही घटना घडूनही तक्रार द्यायला इतका उशीर का, याचीही चौकशी पोलीस प्रीतीकडे करणार, असे समजते. (प्रतिनिधी)
 
वाडियांची सुरक्षा वाढवली
16 जून रोजी प्रीतीची बाजू घेत गँगस्टर रवी पुजारीने वाडिया कुटुंबीयांना धमक्या दिल्या आहेत. पुजारीची पाश्र्वभूमी पाहता मुंबई पोलिसांनी वाडिया यांचे निवासस्थान आणि कार्यालयांबाहेरील बंदोबस्तात वाढ केली आहे. तीनेक वर्षापूर्वी पुजारी टोळीने शहरात गोळीबार सत्र सुरू केले होते.  
वाडिया यांना आलेला फोन पुजारीनेच केल्याचे स्पष्ट झाले आहे. हा फोन वाडियांच्या ज्या कर्मचा:याने उचलला त्याचा जबाब गुन्हे शाखेचे खंडणीविरोधी पथक नोंदवून घेणार आहे. 
पुजारीने केलेला एसएमएस इराणहून आल्याचे गुन्हे शाखेच्या चौकशीत स्पष्ट झाले. मात्र त्याने केलेले व्हीओआयपी कॉल कुठून केले, सव्र्हिस प्रोव्हायडर कोण हे जाणून घेण्यासाठी खंडणीविरोधी पथक तज्ज्ञ अधिका:यांचे मार्गदर्शन घेत असल्याचीही माहिती मिळते. 
 
धमक्यांबाबतही प्रीतीकडे चौकशी 
या प्रकरणी वाडिया कुटुंबीयांना गँगस्टर रवी पुजारीने प्रीतीची बाजू घेत धमक्या दिल्या. त्याचा तपास गुन्हे शाखेकडून सुरू असला तरी मरिनड्राइव्ह पोलीस पुजारीच्या धमक्यांबाबतही प्रीतीकडे चौकशी करू शकतात. प्रीतीच्या सविस्तर जबाबातून या संपूर्ण घटनेवर प्रकाश पडेल. नवे साक्षीदार समोर येतील. नेमकी घटना कुठे, कधी घडली हे समजू शकेल, असे उपायुक्त शिसवे यांनी स्पष्ट केले.