शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
2
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
3
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
4
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
5
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
6
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
7
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
8
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
9
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
10
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
11
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
12
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
13
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
14
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
15
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
16
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
17
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
18
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
19
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
20
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
Daily Top 2Weekly Top 5

आधीच 'वंचित', त्यात मुस्लीम नेत्यांच्या दुफळीने प्रणिती शिंदे अडचणीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2019 18:17 IST

गेल्यावेळी एकटी लढलेल्या एमआयएम सोबत आता प्रकाश आंबडेकर यांच्या वंचित बहुजन आघाडीची ताकद असणार आहे.

मुंबई - लोकसभा निवडणुकीत सोलापूरमधून वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी निवडणुक लढवल्याने, मतांचे विभाजन झाले आणि काँग्रेसचे दिग्गज नेते सुशील कुमार शिंदे यांना पराभव स्वीकारावा लागला. त्याचप्रमाणे आता विधानसभा निवडणुकीत जर वंचितने स्वबळावर लढवण्याचे ठरवले तर, याची पुनरावृत्ती सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या आणि विद्यामान आमदार असलेल्या प्रणीती शिंदे यांच्या मतदारसंघात होण्याची चर्चा पहायला मिळत आहे. एकीकडे 'वंचित'चे आव्हान तर दुसरीकडे पक्षातून मुस्लीम उमेदवाराला सोलापूर शहर (मध्य) मतदारसंघातून उमेदवारी देण्याची मागणी. यामुळे शिंदे कुटुंब दुहेरी संकटात सापडले आहे.

२०१४ मध्ये सोलापूर शहर (मध्य) विधानसभा मतदारसंघात प्रणीती शिंदे यांनी विजय मिळवला होता. त्यावेळी त्यांना ४६ हजार ९०७ मते मिळाली होती. मात्र याच मतदारसंघातून दुसऱ्या क्रमांकावर एमआयएमचे शेख तोफिक यांना मते मिळाली होती. तसेच गेल्यावेळी एकटी लढलेल्या एमआयएम सोबत आता प्रकाश आंबडेकर यांच्या वंचित बहुजन आघाडीची ताकद असणार आहे. त्यामुळे प्रणीती यांच्यासमोर वंचितचे मोठे आव्हान असणार आहे.

त्यातच आता काँग्रेसचे माजी महापौर यू.एन.बेरिया आणि काँग्रेस मानवाधिकार सेलेचे सेलचे प्रदेश महासचिव ईशितयाक जागीरदार यांनी सोलापूर शहर (मध्य) मतदारसंघातून काँग्रेसकडून मुस्लीम उमेदवार देण्यात यावा अशी मागणी केली आहे. मुस्लीम समाजाचा हा हक्काचा मतदारसंघ असून, आजपर्यंत त्यांनी काँग्रेसलाच मतदान केले आहे. त्यामुळे यावेळी मुस्लीम उमेदवार द्यावा अशी मागणी जागीरदार यांनी केली आहे. तर  प्रणिती शिंदे यांची उमेदवारी दुहेरी संकटात सापडली असून, सुशीलकुमार यावर काय मार्ग काढणार हे पाहणे महत्वाचे ठरेल.

लोकसभा निवडणुकीत महाआघाडीत वंचित बहुजन आघाडी जाणार असल्याची चर्चा होती. मात्र पुढे जागावाटपाच्या कारणावरून वंचित आघाडीने स्वबळावर निवडणुका लढवल्या. सोलापूर लोकसभा मतदारसंघात सुशीलकुमार शिंदे यांच्या विरोधात खुद्द प्रकाश आंबडेकर रिंगणात उतरले होते. त्यामुळे दलित-मुस्लीम मतांचे विभाजन झाले आणि शिंदे यांना पराभव स्वीकारावा लागला. आता याची पुनरावृत्ती प्रणीती यांच्या सोलापूर शहर (मध्य) मतदारसंघात होऊ शकते अशी चर्चा जिल्ह्याच्या राजकरणात पहायला मिळत आहे.