शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
4
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
5
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
6
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
7
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
8
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
9
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
10
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
11
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
12
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
13
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
14
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
15
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
16
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
17
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
18
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
19
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
20
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
Daily Top 2Weekly Top 5

प्राणहिता, गोदेचे पाणी पळविणार

By admin | Updated: September 15, 2015 01:19 IST

सिरोंचा तालुक्याच्या सीमेजवळ प्राणहिता व गोदावरी नदीतीरावर नवा सिंचन प्रकल्प सुरू करण्याच्या उद्देशाने तेलंगण सरकारने विशेष हवाई सर्वेक्षण केले आहे. इचमपल्ली प्रकल्प पुनर्जीवित

- अभिनय खोपडे,  गडचिरोलीसिरोंचा तालुक्याच्या सीमेजवळ प्राणहिता व गोदावरी नदीतीरावर नवा सिंचन प्रकल्प सुरू करण्याच्या उद्देशाने तेलंगण सरकारने विशेष हवाई सर्वेक्षण केले आहे. इचमपल्ली प्रकल्प पुनर्जीवित करण्याच्या तेलंगण सरकारच्या हालचालीमुळे तालुक्यातील नागरिकांमध्ये असंतोष पसरला आहेत.तेलंगणने चार ते पाच वर्षांपूर्वी चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांच्या सीमांना लागून तेलंगण राज्यात तुमडीहेटी गावाजवळ विशालकाय चव्हेला सिंचन प्रकल्पाचे काम सुरू केले आहे. या प्रकल्पासाठी चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांतील सहा ते सात तालुक्यांचे शेती सिंचनाचे पाणी पळविले जाणार आहे. आतापर्यंत ५०० कोटी रुपयांचा खर्च तेलंगणने या प्रकल्पावर केला आहे.तत्कालीन काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात भाजपा नेत्यांनी या प्रकल्पाला कडाडून विरोध केला होता. मात्र आता सत्तेवर आल्यानंतर हा विरोध थंड पडला आहे. हा प्रकल्प राष्ट्रीय प्रकल्प घोषित करावा म्हणून तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखरराव यांनी केंद्रीयमंत्री उमा भारती यांची नुकतीच दिल्ली येथे भेट घेतली, अशीही माहिती पुढे आली आहे. हे सर्व सुरू असतानाच महाराष्ट्राच्या सिरोंचा तालुक्याच्या सीमेलगत शुक्रवार व शनिवारी तेलंगण सरकारकडून हेलिकॉप्टरच्या साहाय्याने कालेश्वर भागातील गोदावरी तीरावर कोटापल्ली, महादेवपूर, कालेश्वर या भागात हवाई सर्वेक्षण करण्यात आले. शुक्रवारी ११ सप्टेंबरला चार ते पाच हवाई फेऱ्या करण्यात आल्या; तर शनिवारी १० ते १५ हवाई फेऱ्या तेलंगणा व महाराष्ट्र सीमेलगत गोदावरी नदी भागात झालेल्या आहेत. या हेलिकॉप्टरमध्ये तेलंगणा सरकारच्या जलसंपदा विभागाचे वरिष्ठ अधिकारी होते व त्यांनी या भागात प्राणहिता व गोदावरी नदीच्या पाण्यावर नवीन सिंचन योजना निर्माण करण्याच्या दृष्टीने हे सर्वेक्षण केले, अशी माहिती मिळाली आहे. हेलिकॉप्टरच्या अधिक फेऱ्या सिरोंचा तालुक्याच्या लगत झाल्यामुळे काही नागरिकांनी आदिलाबादच्या वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता त्यांनी हवाई सर्वेक्षण होत असल्याला दुजोरा दिला, अशी माहितीही मिळाली आहे.बाबा आमटे यांनी केला होता विरोधसिरोंचा तालुक्याला लागून १९८०-८५ मध्ये इचमपल्ली धरण निर्माण करण्याचा प्रयत्न तत्कालीन आंध्रप्रदेश सरकारने केला होता. त्यावेळी ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांनी या प्रकल्पाला कठोर विरोध केला. त्यामुळे हा प्रकल्प थंडबस्त्यात टाकण्यात आला होता. आता पुन्हा इचमपल्ली प्रकल्प पुनर्जीवित करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहे. अमरिशराव आत्राम यांचे मौनकाँग्रेस आघाडी सरकारच्या काळात चव्हेला-प्राणहिता या महाकाय सिंचन योजनेला नाग विदर्भ आंदोलन समितीचे केंद्रीय अध्यक्ष व राज्याचे विद्यमान आदिवासी विकास राज्यमंत्री अमरिशराव आत्राम यांनी कठोर विरोध होता. मात्र आता ते या प्रश्नावर मौन बाळगून आहेत.