शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षीक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
3
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
4
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
5
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीचं धक्कादायक कृत्य
6
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
7
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
8
"मी जे सांगेन, तेच इस्रायल करेल", डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, इराण युद्धाबद्दल आता काय बोलले?
9
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
10
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
11
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
12
कमाल! नणंद-भावजयीने फडकवला यशाचा झेंडा; एक DSP तर दुसरी टॅक्स ऑफिसर, रचला इतिहास
13
मुंबईची 'तुंबई' होऊ नये म्हणून ६० दिवसांत काढायचाय ९ लाख मेट्रिक टन गाळ, कंत्राटदारांच्या आडमुठेपणामुळे 'उशीर'
14
Raghav Chadha: राघव चड्ढा की परिणीती चोप्रा; दोघांपैकी कोण आहे सर्वाधिक श्रीमंत; किती आहे नेटवर्थ?
15
लग्नानंतर पती-पत्नीने केली कमाल! मेहनतीनं अभ्यास करून एकाचवेळी दोघेही बनले सरकारी अधिकारी
16
Travel : 'भारताचं स्कॉटलँड' पाहिलंय का? उन्हाळ्याच्या सुट्टीत मनाली-शिमला सोडा, 'या' नंदनवनाला नक्की भेट द्या!
17
१ एप्रिलपासून खिसा रिकामा होणार की भरणार? 'या' १० मोठ्या बदलांचा तुमच्या बजेटवर होणार थेट परिणाम
18
इराणचा अमेरिकन टेकन कंपनी 'Oracle' वर हल्ला; Google, Meta सह 'या' कंपन्यांना दिला इशारा...
19
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
20
सीमा हैदरच्या मुलाचं झालं बारसं; असं नाव ठेवलं की पाकिस्तानला मिरची लागेल!
Daily Top 2Weekly Top 5

Praful Patel : "आधारस्तंभ हरपला; दादांचं निधन माझ्यासाठी फार मोठी वैयक्तिक हानी, राजकारणापलीकडे..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2026 17:07 IST

Praful Patel And Ajit Pawar : अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन, राज्य उत्पादन शुल्क मंत्री अजित पवार यांचं निधन झालं. यामुळे महाराष्ट्रात २८ ते ३० जानेवारी २०२६ या तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचार सभा घेण्यासाठी अजित पवार मुंबईहून बारामती येथे जात होते. सकाळी ८ वाजून ४५ मिनिटांनी बारामती विमानतळावर उतरताना अजित पवार यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला. या अपघातानंतर विमानाला मोठी आग लागली. यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला.

अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. "आमचा आधारस्तंभ हरपला आहे. दादांचं निधन ही माझ्यासाठी फार मोठी वैयक्तिक हानी आहे. आजचा दिवस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासह संपूर्ण महाराष्ट्राच्या इतिहासातील एक काळा दिवस ठरला आहे" असं म्हटलं आहे. प्रफुल पटेल यांनी आपल्या ट्वीटर अकाऊंटवरून याबाबत ट्वीट केलं आहे. 

"आमचे नेते, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री मा. श्री. अजितदादा पवार यांच्या निधनाने आमचा आधारस्तंभ हरपला आहे. ही घटना अत्यंत वेदनादायी आणि धक्कादायक आहे. गेली अनेक वर्षे मी त्यांच्यासोबत काम केले. जेव्हा-जेव्हा दादांसोबत भेट होत असे, ते नेहमीच आस्थेने चौकशी करत. तब्येतीची काळजी घेण्याचा नेहमीच सल्ला देत असत. त्यांचे आणि माझे राजकारणापलीकडे कौटुंबिक संबंध होते. दादांचे निधन ही माझ्यासाठी फार मोठी वैयक्तिक हानी आहे."

"अपघाताच्या आदल्या रात्री बोलणं झालं, माझी मुलगी परत येणार नाही, पण..."; पिंकीच्या आईचा टाहो

 "करतो, बघतो, सांगतो हे शब्द अजितदादांच्या डिक्शनरीत नव्हते"; एकनाथ शिंदेंची भावुक पोस्ट

"त्यांच्या निधनाने राजकारणातील एक कुशल प्रशासक, कठोर निर्णय घेण्याची क्षमता असलेले आणि ग्रामीण भागाशी घट्ट नाळ जोडलेले नेतृत्व आपण गमावले आहे. जवळपास ३५ वर्षांच्या प्रदीर्घ राजकीय प्रवासात त्यांनी असंख्य कार्यकर्ते घडवले, जनतेसाठी तत्पर असणारे पुरोगामी विचारांचे नेतृत्व घडवले तसेच जनतेच्या प्रश्नांसाठी सदैव लढा दिला. ज्या ज्या वेळी दादांशी भेट व्हायची, तेव्हा-तेव्हा सामान्य माणसाच्या अडीअडचणी, शेतकरी, कष्टकरी, युवक आणि महिलांचे प्रश्न सोडवले पाहिजेत, हे आपुलकीने व तळमळीने ते मांडायचे आणि त्यासाठी आग्रही असायचे." 

"राष्ट्रवादी पुन्हा, आपला दादा लय रुबाबदार..."; उत्कर्ष शिंदेने सांगितली अजित पवारांची 'ती' आठवण

"प्रत्येक ठिकाणी वेळेत जाणारे दादा आज चुकीच्या वेळी गेले..."; जितेंद्र आव्हाड भावुक

"सर्वसामान्य जनतेचे लाडके नेतृत्व आज आपल्यात राहिले नाही, ही अत्यंत दुःखद घटना आहे. आजचा दिवस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासह संपूर्ण महाराष्ट्राच्या इतिहासातील एक काळा दिवस ठरला आहे. मा. श्री. अजितदादा पवार यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. या दुःखद प्रसंगी पवार कुटुंबियांप्रती माझ्या सहसंवेदना व्यक्त करतो. तसेच पवार कुटुंबियांना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व कार्यकर्त्यांना हे अपार दुःख सहन करण्याची शक्ती मिळो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. ॐ शांती" असं प्रफुल पटेल यांनी म्हटलं आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Ajit Pawar's Untimely Demise: A Pillar Lost, Beyond Politics

Web Summary : Maharashtra mourns Deputy CM Ajit Pawar's death in a plane crash near Baramati. Praful Patel expresses profound grief, highlighting Pawar's political acumen, concern for the common person, and close family ties. Three days of mourning declared.
टॅग्स :Ajit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसPraful Patelप्रफुल्ल पटेलairplaneविमानPlane Crashविमान दुर्घटनाAccidentअपघातDeathमृत्यू