राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेदरम्यान शरद पवारांसाठी प्रफुल पटेलांची FB पोस्ट, काय म्हणाले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2026 17:35 IST2026-02-22T17:34:59+5:302026-02-22T17:35:42+5:30

Praful Patel on Sharad Pawar: शरद पवार यांची प्रकृती खालावल्याने त्यांना आज पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले

praful patel emotional social media post for sharad pawar during ncp merger talks maharashtra politics | राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेदरम्यान शरद पवारांसाठी प्रफुल पटेलांची FB पोस्ट, काय म्हणाले?

राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेदरम्यान शरद पवारांसाठी प्रफुल पटेलांची FB पोस्ट, काय म्हणाले?

Praful Patel on Sharad Pawar: राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे २८ जानेवारीला विमान अपघातात निधन झाले. या धक्क्यातून महाराष्ट्र पूर्णपणे सावरलेलाही नव्हता, तोच दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची चर्चा सुरु झाली. अजित पवार हयात असताना शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील काही नेत्यांनी अजित पवारांची विलीनीकरणावर चर्चा केली होती असा दावा शरद पवार गटाने सातत्याने केला आहे. पण दुसरीकडे अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आदी नेतेमंडळी मात्र विलीनीकरणाच्या चर्चेबाबत काहीही कल्पना नसल्याचे सांगताना दिसत आहेत. या साऱ्या गोंधळादरम्यान आज प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवार यांच्यासाठी एक फेसबुक पोस्ट लिहिली आहे. या फेसबुक पोस्ट मधून त्यांनी शरद पवारांबाबत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!

प्रफुल पटेलांच्या फेसबुक पोस्टमध्ये काय?

"राजकारण आणि समाजकारणातील उत्तुंग व्यक्तिमत्त्व, आदरणीय शरद पवार साहेब यांच्या सार्वजनिक आणि संसदीय कारकीर्दीला आज साठ वर्षे होत आहेत. १९६७ मध्ये एका तरुण नेतृत्वाच्या रूपाने सुरू झालेला हा प्रवास, आज सहा दशकांनंतरही तितक्याच अदम्य ऊर्जेने सुरू आहे. बारामतीपासून दिल्लीपर्यंत आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवताना, पवार साहेबांनी तळागाळातील माणसाशी असलेली नाळ कधीच तुटू दिली नाही. आज साठ वर्षांनंतरही त्यांचा तोच उत्साह, तीच कामाची जिद्द आणि जनसामान्यांच्या प्रश्नांची जाण पाहून थक्क व्हायला होते. त्यांचे मार्गदर्शन आणि त्यांची ही ऊर्जा आगामी काळातही सर्वांना प्रेरणा देत राहो. संसदीय कारकिर्दीच्या हीरक महोत्सवी वर्षाच्या पवार साहेबांना मनःपूर्वक शुभेच्छा. आपणांस उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना," असे प्रफुल पटेला यांनी लिहिले आहे.

विलीनीकरणाच्या चर्चेचे पुढे काय?

काही दिवसांपूर्वीच रुग्णालयातून परतलेले ज्येष्ठ नेते शरद पवार यांची प्रकृती रविवारी पुन्हा बिघडली. शरद पवारांना पुण्यातील रूबी रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले. अशक्तपणामुळे त्यांना डॉक्टरांच्या देखरेखीत ठेवण्यात आले आहे. शरद पवार यांना सकाळपासून अशक्तपणा जाणवत होता. शरीरातील पाण्याची पातळी कमी झाल्याने त्यांना डिहायड्रेशनचा त्रास जाणवला. त्यामुळे त्यांना रूबी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. डॉक्टरांचे एक पथक त्यांच्या तब्येतीवर लक्ष ठेवून आहेत. सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावर ट्विट करत पवारांच्या तब्येतीची माहिती दिली. शरद पवारांच्या तब्येतीच्या कारणामुळे आता विलीनीकरणाच्या चर्चेचे पुढे काय, याची राजकीय वर्तुळात दबक्या आवाजात चर्चा सुरु आहे.

Web Title : विलय चर्चा के बीच शरद पवार के लिए प्रफुल्ल पटेल का फेसबुक पोस्ट।

Web Summary : विलय की चर्चा के बीच, प्रफुल्ल पटेल ने शरद पवार के लिए एक हार्दिक फेसबुक पोस्ट लिखा, जिसमें सार्वजनिक सेवा में उनके 60 वर्षों का जश्न मनाया गया। उन्होंने पवार के समर्पण और स्थायी ऊर्जा की सराहना की। पवार के हालिया स्वास्थ्य संबंधी चिंताओं ने विलय चर्चा को रोक दिया है।

Web Title : Praful Patel's FB post for Sharad Pawar amid merger talks.

Web Summary : Amidst merger talks, Praful Patel pens a heartfelt Facebook post for Sharad Pawar, celebrating his 60 years in public service. He lauded Pawar's dedication and enduring energy. Pawar's recent health concerns have paused merger discussions.