शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
3
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
4
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
5
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
6
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
7
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
8
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
9
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
10
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
11
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
12
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
13
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
14
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
15
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
16
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
17
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
18
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
19
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
20
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
Daily Top 2Weekly Top 5

हा तर पोस्टरबॉय!

By admin | Updated: October 8, 2014 03:53 IST

विनोद तावडे हे भाजपाचे पोस्टर बॉय असल्याची झोंबरी टीका तावडेंचे नाव न घेता मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज केली

मुंबई : विनोद तावडे हे भाजपाचे पोस्टर बॉय असल्याची झोंबरी टीका तावडेंचे नाव न घेता मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज केली. चारकोप येथील सभेत बोलताना त्यांनी तावडेंची खिल्ली देखील उडवली.इथे एक येडं उभयं... स्वत:चा मतदारसंघ सोडून आलायं. घर कुठे? उभा रहातोय कुठून... सगळी नौटंकी नुसती... पोस्टरबॉय आहे नुसता... अशा शेलक्या शब्दात बोलताना राज म्हणाले, यांच्या सभांना गर्दी होत नाही, यांचे एकायला कोणी येत नाही म्हणून नरेंद्र मोदी बीडच्या सभेत जे बोलले ते अगदी खरे होते. जर गोपीनाथ मुंडे असते तर आपल्याला एवढ्या सभा घेण्यासाठी येण्याची देखील गरज उरली नसती. मात्र यांच्याकडे गल्लीत सभा घेण्यासाठी देखील नेते नाहीत असेही राज यांनी सांगितले. भाजपाचे विनोद तावडे विलेपार्ले भागात रहातात आणि विधानसभेसाठी मात्र त्यांनी सुरक्षीत मतदारसंघ म्हणून बोरीवलीची निवड केली. बोरीवलीतून तीनवेळा निवडून आलेले भाजपाचे हेमेंद्र मेहता यांच्यासह मनिषा चौधरी येथून उत्सूक होत्या. मात्र मेहतांना मागठाणेमधून उमेदवारी देत त्यांचा पत्ता कट केला गेला आणि मनिषा चौधरींना देखील दहिसरमध्ये पाठवण्यात आले. काटेकी टक्कर करुन निवडून यायचे होते तर तावडेंनी मागठाणे येथून मनसेचे प्रवीण दरेकर यांच्या विरोधात दंड का थोपटले नाहीत अशी प्रतिक्रीया भाजपाचे कार्यकर्ते व्यक्त करत आहेत.शिवाय पार्ल्यातून आपल्याला उभे रहायचे आहे पण तो मतदारसंघ शिवसेनेकडे आहे असे सांगून तावडेंनी तेथून काढता पाय घेतला होता. पण युती तुटल्यानंतर पार्ल्याची जागा पराग अळवणीच्या गळ्यात बांधून तावडेंनी सुरक्षीत मतदारसंघ म्हणून बोरीवली गाठल्याची चर्चा पार्ल्यात देखील रंगलेली आहे.