शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
4
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
5
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
6
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
7
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
8
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
9
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
10
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
11
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
12
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
13
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
14
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
15
‘धुरंधर’चा वाद सामंजस्याने सोडवावा, दिग्दर्शक आदित्य धर, निर्मात संतोष कुमार यांना उच्च न्यायालयाच्या सूचना
16
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
17
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
18
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
19
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
20
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
Daily Top 2Weekly Top 5

पोस्टमास्तरचे नातेवाईकच चालवताहेत पोस्ट कार्यालय

By admin | Updated: February 13, 2015 00:57 IST

आर. के. नगर कार्यालयात पोरखेळ : कामाचा निपटारा वेळेवर नसल्याने नागरिक हवालदिल

घन:शाम कुंभार - यड्राव -टपाल कार्यालयाचा दैनंदिन कारभार मुलगी, पुतण्या व इतर नातेवाइकांच्या आधारे बेकायदेशीरपणे सांभाळला जात आहे. आर. के. नगर - यड्राव टपाल कार्यालयाचे पोस्टमास्तर बी. एस. बत्ते यांनी केंद्र शासनाची नोकरी पोरखेळ बनविली आहे. यामुळे कार्यालयातून होणारे टपालासह इतर कार्यक्रम विस्कळीत झाले आहेत. याचा तोटा व नाहक त्रास सहन करण्याची वेळ ग्राहक व एजंटांवर आली आहे. याची दखल वरिष्ठांकडून कशी घेतली जाते, यावरच येथील टपाल कार्यालयाचे नियोजन अवलंबून आहे.इचलकरंजी टपाल कार्यालयाकडून आर. के. नगर टपाल कार्यालयास शहापूर, तारदाळ, शिरढोण, टाकवडे, आर. के. नगर व जांभळी या गावांचे बटवड्याचे टपाल येतात. आर. के. नगर टपाल कार्यालयातून टपाल व त्या संबंधीच्या कामाची विभागणी येथे होते. टपाल कार्यालयात वीज बिल, फोन बिल, आर.डी. भरून घेण्याची सोय आहे. याकरिता तारदाळ व आर. के. नगरमधून काही महिला एजंट म्हणून कार्यरत आहेत. आर. के. नगर कार्यालयातून पोस्टमास्तरांच्या मनमानीमुळे सर्वच गावांचा बटवडा विस्कळीत झाला आहे. आर.डी. भरण्यासाठी लाईट बिल व फोन बिल यासाठी पैसे द्या, नंतर बिल पासबुक घेऊन जा, अशी कामाची पद्धत सुरू झाल्याने एजंट व ग्राहक त्रस्त आहेत.पोस्टातून येणारी पत्रे वेळेवर संबंधितांना पोहोचत नसल्याने त्यांना आर्थिक, मानसिक त्रास होत आहे. कारण शासकीय, नोकरीचे अनुदान व महत्त्वाचे टपाल पोस्टाद्वारे येतात. ती वेळेवर न मिळाल्यास ग्राहकांचे सर्वांगीण नुकसान होत आहे. काही ग्राहकांचे खाती बंद करण्याचे अर्ज चार महिन्यांपासून तसेच पडून आहेत. यड्राव परिसरात वाहनांची विक्री करणारी दोन-तीन केंदे्र आहेत. त्यांच्याकडून येणारी कागदपत्रे तशीच धूळ खात पडली आहेत. या सर्व प्रकाराने नागरिक हवालदिल झाले आहेत.पोस्टमास्तर बत्ते हे पोस्ट कार्यालयाचा संगणकाद्वारे व्यवहार करण्यासाठी मुलगी, पुतण्या व इतर नातेवाइकांना बेकायदेशीरपणे वापरास देत आहेत. कोणीही अर्ज घेऊन आले की, साहेब येऊ देत. नंतर या, असे उत्तर त्यांच्याकडून मिळत आहे. केंद्र शासनाचे अत्यंत महत्त्वाचे व जबाबदारीचे पोस्टमास्तर पद असून, बेकायदेशीर वापर करून पोस्टमास्तर पोरखेळ करीत आहेत. या मुलांकडून एखादी चूक झाल्यास, अजाणतेपणी महत्त्वाची टपाल गहाळ झाल्यास ग्राहकांचे मोठे नुकसान होऊ शकते. इतकी बेफिकिरी केंद्र शासकीय कर्मचाऱ्यांकडून होत आहे. याकडे वरिष्ठांकडून कशी दखल घेतली जाते, यावर येथील टपाल कार्यालयाचे नियोजन अवलंबून आहे. तसेच पोरखेळ थांबवावा, ग्राहकांना सुलभ सेवा मिळावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.दोषी आढळल्यास कारवाईपोस्ट कार्यालयामध्ये विभागाच्या कर्मचाऱ्याव्यतिरिक्त कोणासही काम करता येत नाही. तसा कोणी प्रकार सुरू केला असेल, तर तो बेकायदेशीर आहे. त्याची चौकशी करून दोषी आढळल्यास कारवाई करण्यात येईल, असे कोल्हापूर विभागाचे सीनिअर सुपरिटेंडेंट पोस्ट आॅफिसर रमेश पाटील यांनी सांगितले.