शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल-डिझेल महागणार, सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसणार? केंद्र सरकारचे मोठे संकेत
2
“२२ लाख विद्यार्थ्यांची स्वप्ने धुळीला मिळाली”; NEET 2026 परीक्षा रद्द, राहुल गांधी संतापले
3
Top Marathi News LIVE Updates: सोलापूर शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं धावपळ
4
मुख्यमंत्री विजय यांचा मोठा निर्णय! आपल्या खास ज्योतिष्याला बनवलं थेट 'OSD'
5
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
6
मूर्ती लहान, कीर्ती महान! ३ वर्षे ११ महिन्यांच्या जान्हवी सोनीची कमाल; नावावर ३ इंटरनॅशनल रेकॉर्ड
7
शहरातल्या गजबजाटापासून दूर थंड हवा, झोपाळ्यावर डुलकी; महापौर रितू तावडे यांचा गावी दौरा
8
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
9
संतापजनक! पिझ्झा तयार करताना थुंकायचा; किळसवाणा Video व्हायरल, लोकांनी बेदम चोपलं
10
सोनं खरेदी करू नका, असं आवाहन इंदिरा गांधींनी खरंच केलं होतं का?; व्हायरल कात्रणामागचं सत्य काय?
11
'नीट' पेपर फुटीमागे महाराष्ट्र कनेक्शन! जयपूरमधून लीक झालेला पेपर नाशिकमध्ये प्रिंट झाल्याचा संशय
12
Travel : भारताच्या 'मिनी थायलंड'पासून अवघ्या ३ तासांवर आहे 'हे' सुंदर ठिकाण; निसर्गात रमून थकवा विसराल!
13
‘सनातन धर्माला संपवलंच पाहिजे’, विजय यांच्यासमोर उदयनिधींचं विधान, मुख्यमंत्र्यांनी दिला असा प्रतिसाद
14
कल्याणमध्ये ७८ वर्षीय भोंदूबाबाचा अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार
15
NEET Exam Paper Leak : "पप्पा, हाच पेपर येईल, हॉस्टेलमधील मुलींना द्या"; NEET चं केरळ कनेक्शन, १८० पैकी १३० प्रश्न लीक
16
कान्समध्ये अवतरली जणू स्वप्नातील परी! मिंट-ग्रीन गाऊनमध्ये आलिया भट्टचा 'प्रिन्सेस लूक' व्हायरल
17
Vastu Shastra: घरात पैसे टिकत नाहीत? मग चुकूनही 'या' दिशेला ठेवू नका तुमची तिजोरी!
18
सीजफायरचा फक्त देखावा! इराणने रशिया-चीनकडून जमवला शस्त्रास्त्रांचा डोंगर; 'या' देशांना दिला इशारा
19
ज्याने कपाटात 'सीक्रेट' कप्पा बनवला, त्यानेच हात साफ केला! ३० लाखांची चोरी करून कारागिर फरार
20
Gold Import: सोन्याच्या आयातीमुळे देशाच्या तिजोरीवर पडला मोठा भार, सोन्याने भारताची चिंता का वाढवलीये?
Daily Top 2Weekly Top 5

अधिग्रहित जमिनीचा ताबा शेतकर्‍यांकडेच

By admin | Updated: July 17, 2014 00:43 IST

संग्रामपूर तालुक्यातील सावळी येथील शेतकर्‍यांच्या अधिग्रहीत जमिनीचा प्रश्न; उच्च न्यायालयाचे ‘जैसे-थे’चे आदेश.

संग्रामपूर : तालुक्यातील सावळी येथील शेतकर्‍यांच्या अधिग्रहीत जमिनीचा ताबा शेतकर्‍यांकडेच ठेवावा, असा आदेश १४ जुलै रोजी नागपूर उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्या.बी.आर.गवई आणि एस.बी.शुक्रे यांच्या खंडपीठाने दिला आहे. या आदेशामुळे शेतकर्‍यांना नवीन जमीन अधिग्रहण कायद्याच्या तरतुदीनुसार दिलासा मिळाला आहे.
सावळी या पूरग्रस्त गावाच्या पुनर्वसनाकरिता १९६७ साली निवाडा पारित करुन शेतकर्‍यांच्या जमिनी अधिग्रहीत केल्या होत्या; परंतु त्या गावाचे पुनर्वसन आजतागायत झालेच नाही. त्यामुळे अधिग्रहीत जमिनींचा ताबा हा मूळमालक शेतकर्‍यांकडेच होता आणि तेव्हापासून ते आजपर्यंत वहिती करीत आहेत. आता सावळी हे गाव जिगाव प्रकल्पबाधित झाल्यामुळे त्या गावाच्या पुनर्वसनाकरिता शासनाने पुन्हा प्रक्रिया सुरु केली आहे. आणि या शेतकर्‍यांच्या जमिनीला जोडून अतिरिक्त जमीन अधिग्रहीत करीत आहेत; तसेच आधी घेतलेली जमीन ही शासनाची असल्यामुळे त्याचासुद्धा ताबा घेणेबाबत जमीन मोजणी प्रक्रिया सुरु झाली. या प्रकारामुळे जमिनीचे ताबाधारक रामराव रामदेव अरबट, रामराव ओंकार बावने आणि इतर पाच शे तकर्‍यांनी अँड.प्रदीप क्षीरसागर पाटील यांच्या मार्फत उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल करुन १ जानेवारी २0१४ पासून नव्याने अमलात आलेल्या नवीन भुमि अधिग्रहण कायदयाच्या तरतुदीनुसार १९६७ साली झालेले अधिग्रहण रद्द करण्याबाबत आणि सदर जमिनीची मालकी परत शेतकर्‍यांना देणेबाबत तसेच ताबा अबाधित ठेवण्याबाबत याचिकेत मागणी केली आहे. त्यावर १४ जुलै रोजी सुनावणी होऊन न्यायालयाने जैसे थे चा आदेश पारित केला व महसूल सचिवाला नोटीस काढल्या आणि पुढील सुनावणी चार आठवड्यांनी ठेवली आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे.