शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
2
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
3
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
4
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
5
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
6
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
7
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
8
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
9
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
10
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
11
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
12
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
13
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
14
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
15
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
16
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
17
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
18
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
19
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
20
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
Daily Top 2Weekly Top 5

अश्लील... छे छे... भावविभोर गाण्यात रंगले गणराय

By admin | Updated: September 6, 2016 12:06 IST

खरं तर ही गाणी लिहिणाऱ्यांना अभिप्रेत असलेला भाव न समजल्यामुळे असा त्रास होतो. ही गाणी समजावी, आपला त्रास कमी व्हावा म्हणून हा छोटासा प्रयत्न

- रवींद्र आंबेकर 
गणपती किंवा इतर सणाच्या काळात कर्णकर्कश्श आवाजात डीजेवर, तथाकथित अश्लील गाण्यांवर बीभत्स नाच केला जातो. त्याचा अनेकांना त्रास होतो. खरं तर ही गाणी लिहिणाऱ्यांना अभिप्रेत असलेला भाव न समजल्यामुळे असा त्रास होतो. ही गाणी समजावी, आपला त्रास कमी व्हावा म्हणून हा छोटासा प्रयत्न... हा विद्यादानाचा गीतरूपी ठेवा गणेशउत्सवाच्या माध्यमातून लोकांच्या कानी जबरदस्ती उतरवणाऱ्या मंडळांनाही सलाम...
आता वाट बघतोय रिक्षावाला हेच गाणं बघा ना...
कामावर जायला उशीर झायला 
बघतोय रिक्षावाला 
वाट माझी बघतोय रिक्षावाला...
अतिशय भाव पूर्ण गाणं आहे. 
अर्थात या धकाधकीच्या जीवनात माझ्या हातून सरळ काहीच होत नाहीय. माझी सगळी गणितं चुकतायत. मला काहीच सुचत नाहीय. कोणीच सोबती नाही, सहकारी नाही, मदत करायला नाही. आपल्याला उशीर झाल्यावर, लगबग असताना जसं आपण रिक्षावाल्याला शोधत असतो, बघत असतो. आपल्याला बघून रिक्षावाला जोरात पुढे जातो असं वाटत असतो. तोही आपल्याला नाकारतो असं आपल्याला वाटतं. अर्थात अडचणीत सापडल्यावर भगवंत शोधत असतो. भगवंत आपल्याला सोडून पुढे चाललाय अशी आपली भावना होते, नैराश्य  येते. पण प्रत्यक्षात रिक्षावाला म्हणजे भगवंत आपल्याला बघत असतो. त्याचं आपल्यावर बारीक लक्ष असतं. त्याच्या नजरेतून आपण सुटू शकत नाही. आणि समस्यांना तोंड द्यायला तो आपल्याला समर्थ करतो... तो म्हणतो तु हो पुढे मी तुझ्या पाठिशी आहेच...
 
बिडी जलैले जिगर से पिया ... 
जिगर मा बडी आग है.... 
अर्थात या ह्रदयात भगवंताच्या भक्तीची आग पेटली आहे. या आगीच्या धगीचा- अंगाराचा फायदा सर्वांना होणार आहे. कुणाला थोडी आग दिल्याने ती कमी होणार नाही. भगवंताच्या भक्तीने माझ्या ह्रदयात लागलेली ही आग इतरांच्या बॉडीत,  बीडी अर्थात श्वास फुंकण्याचं काम करत आहे.
 
 
आवाज वाढव DJ  तुला आईची शप्पथ आहे... 
अर्थात या जगरहाटीच्या कोलाहलात माझ्या अंतर्मनाचा आवाज क्षीण झालाय. हे DJ म्हणजे भगवंता हा आवाज वाढव, मला आत्मबळ दे. तुझ्याशी तादात्म पावण्यासाठी, माझा आवाज तुझ्या पर्यंत पोहोचवण्यासाठी माझ्या आवाजात बळ भर... हे भगवंता तू हे करणार नसशील तर जगन्नियंता असलेल्या तुझ्या आईची तुला शपथ आहे. माझा जीव तळमळतोय.
 
 
पप्पी दे पप्पी दे पारूला 
अर्थात हे भगवंता मी किती ही मोठा झालो तरी तुझ्या समोर लहानच आहे. श्लील- अश्लीलतेच्या भावनेच्या पुढे जाण्यासाठी मला मदत कर. जसं लहान मुलांचं अतिशय निरागसतेने- प्रेमाने आपण चुंबन घेतो तसंच हे भगवंता तू पारू म्हणजे मला भक्तिरसाचं चुंबन दे. मला तो निरागस भाव दे.
 
 
पोरी जरा जपून दांडा धर...
शिटी वाजली, गाडी सुटली, पोरी जरा जपून दांडा धर या गाण्याच्या माध्यमातून मुलींच्या करीअरच्या संदर्भात जे काही मार्गदर्शन गीतकारानं केलं आहे, त्याला तोड नाही. नीट आली गेली, सीईटी आली गेली... उच्च शिक्षण घ्यायचं असेल, सावित्रीच्या लेकींना मुलांच्या खांद्याला खांदा लावून करीअर घडवायचं असेल तर मुलींनी शिक्षणरूपी दांडा घट्ट पकडायला हवा असा मुलभूत संदेश या गाण्यात आहे...
तर, शांतताप्रेमी गणेशभक्तांनो... उगाच त्रास करून घेऊ नका... या गोंगाटामागची समाजसेवी तळमळ समजून घ्या, उगीच टिळक तुम्ही आज असतात तर वगैरे आउटडेटेड मेसेज फॉरवर्ड करू नका आणि मुन्नी बदनाम हुई, डर्लिंग तेरे लियेचा गर्भित अर्थ शोधायला लागा...
(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत.)