शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील लोकसंख्येचा आलेख चढता

By admin | Updated: July 11, 2014 00:13 IST

तीन दशकांतील लोकसंख्येच्या दरवाढीचा विचार करता ठाणो जिल्ह्याच्या लोकसंख्यावाढीचा आलेख सातत्याने वाढत आहे.

सुरेश लोखंडे - ठाणो
तीन दशकांतील लोकसंख्येच्या दरवाढीचा विचार करता ठाणो जिल्ह्याच्या लोकसंख्यावाढीचा आलेख सातत्याने वाढत आहे. 2क्क्1 च्या जनगणनेमध्ये 35.91 टक्के दरवाढ होऊन ती 2क्11 मध्ये एक कोटी 1क् लाख 54 हजार 131 झाली आहे. जगातील 119 देशांच्या तुलनेत ठाणो जिल्ह्याची लोकसंख्या सर्वाधिक असल्याचे उघड झाले आहे. 
जागतिक लोकसंख्या दिनाचे औचित्य साधून आढावा घेतला असता जगातील 193 देशांपैकी 119 देशांच्या लोकसंख्येपेक्षा ठाणो जिल्ह्याची लोकसंख्या सर्वाधिक असल्याचे जिल्हाधिका:यांच्या एका अहवालाद्वारे उघड झाले आहे. याशिवाय, देशामधील 17 राज्ये व सर्व केंद्रशासित प्रदेशांपेक्षा ठाण्याची लोकसंख्या सर्वाधिक आहे. अन्य क्षेत्रंसह लोकसंख्येच्या दृष्टीनेदेखील अग्रभागी राहिलेल्या ठाणो जिल्ह्याचे विभाजन होऊन 1 ऑगस्टपासून पालघर जिल्हा अस्तित्वात येणार आहे.
तलासरी, डहाणू, विक्रमगड, जव्हार, मोखाडा, वाडा, पालघर आणि वसई या तालुक्यांच्या 14 लाख 35 हजार 178 लोकसंख्येचा नवा पालघर जिल्हा राहणार आहे. उर्वरित राहिलेल्या शहरी भागांच्या ठाणो जिल्ह्यात ठाणो, भिवंडी, शहापूर, कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ आणि मुरबाड आदी तालुक्यांची सर्वाधिक 96 लाख 18 हजार 953 लोकसंख्या शिल्लक राहणार आहे. सध्याच्या एकसंध जिल्ह्याच्या एक कोटी 1क् लाख  54 हजार 131 लोकसंख्येपैकी शहरी भागांत 85 लाख तीन हजार 94 लोक वास्तव्याला आहेत. उर्वरित 25 लाख 51 हजार 37 लोक ग्रामीण, दुर्गम भागात वास्तव्य करीत आहेत. 
राज्याच्या लोकसंख्येपैकी 9.84 टक्के लोकसंख्या ठाणो जिल्ह्यात आहे. 72.58 टक्के नागरी लोकसंख्या असलेला ठाणो जिल्हा मुंबईच्या दोन जिल्ह्यांनंतर  सर्वाधिक नागरीकरण झालेला जिल्हा आहे. या जिल्ह्याच्या लोकसंख्येची घनता दर चौरस किलोमीटरला 1157 इतकी आहे.  राज्याचे हे प्रमाण केवळ 365 इतके आहे. 
9558 चौ.कि.मी. क्षेत्रफळाच्या या जिल्ह्याचे क्षेत्रफळ राज्याच्या क्षेत्रफळाच्या 3.11 टक्के आहे. जिल्ह्याच्या 15 तालुक्यांपैकी शहापूर तालुक्याचे क्षेत्रफळ सर्वाधिक 1629 चौ.किमी. आहे. सर्वात लहान तालुका म्हणून ओळखल्या जाणा:या उल्हासनगरचे क्षेत्रफळ केवळ 13 चौ.किमी. आहे. 
राज्याच्या 72क् किमीच्या समुद्रकिना:यापैकी 112 किमी.चा किनारा ठाण्याला लाभला आहे. यातील 11328 हेक्टर क्षेत्र भूजल मासेमारीसाठी अनुकूल आहे. किनारपट्टीलगतच्या लहान-मोठय़ा 82 गावांतून मासेमारी केली जात आहे.
शहरी आणि ग्रामीण अशा दोन भागांत विभागल्या गेलेल्या ठाणो जिल्ह्याच्या लोकसंख्येपैकी 85 लाख तीन हजार 94 लोकसंख्येमध्ये 45 लाख 73 हजार 958 पुरुष व 39 लाख 29 हजार 136 स्त्रियांचा समावेश आहे.  ग्रामीण भागातील 25 लाख 51 हजार 37 या लोकसंख्येत 13 लाख पाच हजार 429 पुरुष असून 12 लाख 45 हजार 6क्8 स्त्रिया आहेत. शहरात एक हजार पुरुषांमागे 859 स्त्रिया असे प्रमाण आहे. 
ग्रामीण भागात ‘954 स्त्रिया’ असे प्रमाण असल्यामुळे शहराच्या तुलनेत ग्रामीण, दुर्गम भागांत सर्वाधिक महिला वास्तव्याला आहेत. यावरून मुलींचा जन्मदर शहराच्या तुलनेत ग्रामीण, आदिवासी, दुर्गम भागांत जास्त असल्याचे उघड 
झाले आहे. 
जिल्ह्यातील साक्षरतेचे प्रमाण  86.18 टक्के आहे. यामध्ये पुरुषांच्या साक्षरतेचे प्रमाण 9क्.9क् टक्के असून 8क्.87 टक्के स्त्री साक्षरतेचे प्रमाण आह़े                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                      
 
देशामधील 17 राज्ये व सर्व केंद्रशासित प्रदेशांपेक्षा ठाण्याची लोकसंख्या सर्वाधिक आहे. अन्य क्षेत्रंसह लोकसंख्येच्या दृष्टीनेदेखील अग्रभागी राहिलेल्या ठाणो जिल्ह्याचे विभाजन होऊन 1 ऑगस्टपासून पालघर जिल्हा अस्तित्वात येणार आहे.
 
सध्याच्या एकसंध जिल्ह्याच्या एक कोटी 1क् लाख  54 हजार 131 लोकसंख्येपैकी शहरी भागांत 85 लाख तीन हजार 94 लोक वास्तव्याला आहेत. उर्वरित 25 लाख 51 हजार 37 लोक ग्रामीण, दुर्गम भागात वास्तव्य करीत आहेत.