शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
2
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
3
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
4
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
5
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
6
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
7
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
8
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
9
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
10
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
11
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
12
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
13
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
14
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
15
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
16
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
17
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
18
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
19
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
20
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

सायबरविश्वावर पोलिसांची करडी नजर

By admin | Updated: July 28, 2015 02:57 IST

याकूब मेमनची फाशी व पंजाबमध्ये झालेला दहशतवादी हल्ला या दोन घटनांमुळे महाराष्ट्र पोलीस सतर्क झाले असून, ते गुंडांवर करडी नजर ठेवून आहेत. मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर व औरंगाबाद

- डिप्पी वांकाणी, मुंबईयाकूब मेमनची फाशी व पंजाबमध्ये झालेला दहशतवादी हल्ला या दोन घटनांमुळे महाराष्ट्र पोलीस सतर्क झाले असून, ते गुंडांवर करडी नजर ठेवून आहेत. मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर व औरंगाबाद या शहरातील सुरक्षा कडक करण्यात आली असून महाराष्ट्र पोलिसांचा सायबर सेल २४ तास काम करत आहे. फेसबुक व टिष्ट्वटरवरील आक्षेपार्ह पोस्ट काढून टाकल्या जात आहेत. राज्यात अलर्ट लावण्यात आला नाही; पण वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांवर प्रचंड दबाव असून ते कोणतीही संधी जाऊ देण्यास तयार नाहीत. संपूर्ण राज्यातील पोलीस ठाण्यांना रेल्वेस्थानके व मॉल्समधील सुरक्षा वाढविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मॉल्समध्ये पोलिसांनी खाजगी सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने काम करावे, असे सांगण्यात आले आहे, असे विशेष पोलीस महानिरीक्षक प्रभात कुमार यांनी सांगितले. मॉल्समधील सुरक्षा रक्षकांनी सतर्क व्हावे, पार्र्किंग, येण्या जाण्याचे रस्ते यावर करडी नजर ठेवावी, असे कुमार यांनी म्हटले आहे. वेबजगावर आमची बारीक नजर आहे, आमचे लोक आॅनलाईन वर्ल्डवर २४ तास नजर ठेवून आहेत. दरम्यान, मुंबई पोलिसांच्या सायबर सेलमधील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार फेसबुक व टिष्ट्वटरवरील अनेक आक्षेपार्ह टिष्ट्वट व पोस्ट काढून टाकण्यात आले आहेत. कोणतीही पोस्ट इतरांना दुखावण्यासारखी आहे असे वाटले तर लगेच ती डिलिट केली जाते, असे सूत्रांनी सांगितले.