शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
2
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
3
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
4
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
5
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
6
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
7
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
8
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
9
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
10
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
11
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
12
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
13
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
14
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
15
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
16
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
17
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
18
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
19
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
20
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
Daily Top 2Weekly Top 5

माकप कार्यकर्त्यांवर पोलिसांचा लाठीमार

By admin | Updated: September 4, 2015 01:02 IST

जिल्हा दुष्काळग्र्रस्त जाहीर करावा, या मागणीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गावर आंदोलन करणाऱ्या माकपच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी लाठीमार केला

परभणी : जिल्हा दुष्काळग्र्रस्त जाहीर करावा, या मागणीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गावर आंदोलन करणाऱ्या माकपच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी लाठीमार केला. यामध्ये ३० ते ४० आंदोलक जखमी झाले, तर आंदोलकांनी केलेल्या दगडफेकीत ६ पोलीस जखमी झाले.परभणी जिल्ह्यातील दुष्काळाची पाहणी करण्यासाठी गुरुवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास मुख्यमंत्र्यांचे आगमन झाले. मुख्यमंत्री पाथरी, मानवतमार्गे परभणीहून गंगाखेडकडे दुष्काळाची पाहणी करण्यासाठी जाणार होते. परभणी- गंगाखेडमार्गावरील सिंगणापूर फाटा येथे जवळपास २ हजार माकपचे कार्यकर्ते व शेतकरी कॉ. विलास बाबर यांच्या नेतृत्वाखाली सकाळपासूनच भजन आंदोलन करीत होते. दुपारी दीड वाजेच्या सुमारास या आंदोलकांना पोलिसांनी हटविण्याचा प्रयत्न केला. यातून वादावादी झाली. आंदोलक जागेवरून हालत नसल्याने २ वाजेच्या सुमारास पोलिसांनी लाठीमार केला. आंदोलकांनीही या वेळी जोरदार दगडफेक सुरू केली. तीन वाहनांची तोडफोड करण्यात आली. पोलिसांच्या वाहनांची हवा सोडून देण्यात आली. या दगडफेकीत सहायक पोलीस निरीक्षक सुनील पुंगळे, पोलीस कर्मचारी स. रहीम स. अजीज, एल.पी. कांबळे, पठार शब्बीर खॉ, आवेज काजी व अन्य दोन महिला पोलीस जखमी झाले. पोलिसांनी या वेळी विलास बाबर यांच्यासह जवळपास १०० कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. (प्रतिनिधी) पाथरी तालुक्यातील ढालेगाव येथे शेतकऱ्यांनी तीन वेळा मुख्यमंत्र्यांचे भाषण थांबविण्याचा प्रयत्न केला. फक्त घोषणा करू नका, आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना काय देणार ते सांगा, असा सवाल स्वराज घुंबरे या शेतकऱ्याने केला. यावर मुख्यमंत्र्यांनी शेतकरी आत्महत्या झालेल्या कुटुंबाला विहीर, शेततळे आणि विद्युत मोटार देण्यात येईल, अशी घोषणा केली. त्यानंतर काही वेळात पुन्हा शेतकऱ्यांनी कर्जमाफीचे काय झाले? असे विचारायला सुरुवात केली. त्यावर मुख्यमंत्र्यांनी येथे राजकारण आणू नका, पक्षीय मतभेद बाजूला ठेवा, असे सांगत भाषण आटोपते घेतले. शिवसैनिकांची घोषणाबाजीमुख्यमंत्र्यांचे ढालेगाव येथील सभास्थळी आगमन झाल्यानंतर शिवसेनेच्या काही कार्यकर्त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने घोषणा दिल्या.