शहरं
Join us  
Trending Stories
1
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
2
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
4
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
5
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
6
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
7
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
8
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
9
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
10
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
11
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
12
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
13
लहान वयात मोठी व्याधी! ४ ते ८ वर्षे वयोगटातील मुलांमध्ये वाढतोय आता ‘किडनी स्टोन’चा धोका 
14
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
15
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
16
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
17
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
18
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
19
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
20
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

व्हॉट्सअॅपमुळे पोलिसाने केली चिमुरडीची सुटका

By admin | Updated: June 1, 2015 08:47 IST

व्हॉट्सअॅपवरील फोटो आणि प्रसंगावाधामुळे वाहतूक पोलिसाने एका अपहरित मुलीची सुखरूप सुटका केली.

ठाणे : घाटकोपरच्या पंतनगर भागातून अपहरण केलेल्या रिया सुनील गुप्ता (६) या मुलीची ठाणे शहर वाहतूक शाखेचे हवालदार जुबेर तांबोळी यांनी सुटीवर असतानाही रामबिलाल प्रजापती (२५, रा. घाटकोपर) याच्या ताब्यातून सुटका करून त्यालाही मुंबई पोलिसांच्या ताब्यात दिले. खासगी कामासाठी पुण्याला निघालेल्या तांबोळींनी बजावलेल्या कर्तव्याबद्दल पोलीस दलात त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.वाहतूक उपशाखा कोपरी येथे नेमणुकीस असलेल्या तांबोळी यांची ३१ मे रोजी साप्ताहिक सुटी होती. त्याच दिवशी त्यांच्या मामेभावाचा पुण्यात साखरपुडा होता. त्यासाठी पहाटे ५.३० वा.च्या सुमारास रेल्वेने अंबरनाथ आणि तिथून नंतर नातेवाइकांसमवेत ते पुण्याला जाणार होते. ठाणे रेल्वे स्थानकातील फलाट-२ च्या पुलावर ते रेल्वेची वाट पाहत असताना त्यांच्या समोरून हे दोघेही जाताना दिसले. या दोघांनाही कुठेतरी पाहिल्यासारखे त्यांना जाणवल्याने त्यांनी मोबाइल तपासला. त्यांच्या व्हॉट्सअ‍ॅपवर उपनिरीक्षक आर.के. सोनगिरे यांनी अपहरण झालेल्या रिया आणि रामबिलाल यांचा फोटो पाठविला होता. फोटो आणि त्या दोघांमधील साम्य आढळल्यानंतर त्यांनी त्यांच्यावर पाळत ठेवली. या तरुणाच्या हालचाली संशयास्पद आढळल्यामुळे तांबोळींनी त्याची चौकशी केली. तेव्हा त्यांच्याशी त्याने झटापट केली. त्यांनी मदतीचे आवाहन करूनही कोणीही प्रवासी पुढे आला नाही. त्याला तसेच पकडून वाहतूक शाखेच्या कार्यालयात आणि नंतर रेल्वे पोलीस ठाण्यात नेले. रियाचे २७ मे रोजी सायंकाळी ६.३० वा.च्या सुमारास कामराज मार्ग येथील प्रेमा किराणा स्टोअर्स येथून त्याने अपहरण केले होते. त्याबाबतचा पंतनगरमध्ये गुन्हाही दाखल आहे. प्रेमा किराणासमोरील सीसीटीव्हीमुळे व्हॉट्सअ‍ॅपवरून त्यांचा फोटोही पोलिसांकडून व्हायरल झाला होता. ठाण्यात मिळालेल्या रियाचा फोटो रेल्वे पोलिसांनी पंतनगर पोलिसांना व्हॉट्सअ‍ॅप केल्यावर ही तीच मुलगी असल्याची खात्री झाली. पंतनगरचे सहायक पोलीस निरीक्षक डुकले यांनी ठाणे गाठून तिला ताब्यात घेतले. तेव्हा त्यांनाही मोठा आनंद झाला. चार पथकांद्वारे उत्तर प्रदेशपर्यंत मुंबई पोलिसांकडून तिचा शोध घेण्यात येत होता. त्यामुळे ठाणे पोलिसांच्या एका शिपायाने केलेल्या कामगिरीबद्दल मुंबई पोलिसांनीही तांबोळींचे कौतुक केले.