शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
2
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
3
इस्रायलसाठी हेरगिरी! मोसादच्या गुप्तहेराला इराणने दिली फाशी, मेहदी फरीद काय काम करायचा?
4
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
5
म्हशीला रेबीज, ३० जणांना टोचावे लागले इंजेक्शन! प्रकरण ऐकाल तर हादरून जाल
6
Top Marathi News LIVE Updates: खरातच्या पत्नीच्या नावे उरणमध्येही २० गुंठे जमीन
7
उन्हाळ्यात किचनमध्ये काम करताना नुसत्या घामाच्या धारा; 'असं' ठेवा स्वत:ला थंड थंड कूल कूल
8
अर्जुन तेंडुलकर आणि वैभव सूर्यवंशी यांच्यातील फिल्डबाहेरची खास गोष्ट; कमाईच्या बाबतीत कोण भारी?
9
साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
10
५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
11
AC सोबत पंखा सुरू ठेवणं फायद्याचं की तोट्याचं? वीज बिल वाचवणारी 'ही' आहे खास ट्रिक
12
Nagpur: जिममधील अतिव्यायामामुळे २३ वर्षीय तरुणाच्या मेंदूची फाटली नस, डॉक्टरांनी असे वाचवले प्राण!
13
आठ इराणी महिलांना मृत्यूदंड देणार? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना सोडा, ही चर्चेची चांगली सुरूवात'; इराणने दिले उत्तर
14
रिचार्ज महागण्यास सुरुवात? Airtel चा ग्राहकांना झटका, ७९९ रुपयांचा प्लॅन हटवला, ८५९ चा महागला; काय बदललं?
15
"आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा..." रिक्षाचालकांच्या मराठी विरोधी भूमिकेवर हेमंत ढोमे भडकला
16
IPL 2026: MI vs CSK सामन्यात MS Dhoni खेळणार? चेन्नईच्या नेट प्रॅक्टिसमधून चित्र झालं स्पष्ट
17
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
18
इराणविरोधातील मोहिमेत मोसादचा महत्वाचा गुप्तहेर 'मेम' मारला गेला; इस्रायलने पहिल्यांदाच दिली कबुली
19
Palmistry: सावधान! तुमच्या राहु पर्वतावर 'क्रॉस' किंवा 'तीळ' तर नाही ना? हस्तशास्त्राचा मोठा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस झाल्याचे बॅनर झळकावले; गावभर पेढे  वाटले; नंतर पोलिसांनी घरी जाऊन वाजवला बँड

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2026 12:50 IST

पोलीस झाल्याचे बॅनर झळकावून गावभर पेढे  वाटणाऱ्या तरुणाला पोलिसांनी चांगलाच इंगा दाखवला आहे. 

कल्याणराव आवताडेलोकमत न्यूज नेटवर्कपुणे/धायरी : ‘सिंघम’ किंवा ‘सिम्बा’सारख्या चित्रपटांचा प्रभाव म्हणायचा की मुलीवाल्यांनी लग्नासाठी केलेली अट? एका तरुणाने आपली पोलीस म्हणून निवड झाल्याचे फ्लेक्स झळकावले, पेढे वाटले आणि चक्क पोलिसांना आपल्या दारी ओढून घेतलं. पण हा ‘आनंदोत्सव’ काहीच तासांत गुन्हा बनला आणि नऱ्हे पोलिसांनी तरुणाचा हा ट्रेण्डसेटर करण्याचा बनाव उघड केला. ऋषिकेश जाधव असे या आगळे वेगळे धाडस करणाऱ्याचे नाव आहे.

आईच्या आनंदासाठी धाडस...

सिंहगड रस्ता परिसरातील नऱ्हे येथील तिडके डेअरी भागात राहाणारा ऋषिकेश आपल्या आईसह भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करतो. त्याचे पोलिस होण्याचे स्वप्न होते; पण उंची कमी पडल्याने पोलिस भरतीचे दार त्याच्यासाठी बंद झाले. घरच्यांनी लग्नासाठी तगादा लावला होता. कदाचित ‘मुलगा पोलिस आहे’ असे सांगितले तर चांगले स्थळ येईल किंवा केवळ आईचा आनंद पाहण्यासाठी ऋषिकेशने एक भयंकर धाडस केले. त्याने आपण ‘पुणे पोलिस’ दलात भरती झाल्याची खोटी बातमी घरी दिली. सोसायटीमध्ये पेढे वाटले, चौकात स्वतःच्या फोटोसह ‘पुणे पोलिसपदी निवड’ झाल्याचे भव्य फ्लेक्स देखील लावले. मोबाइलवर पोलिस वर्दीतील फोटो व्हॉट्सॲप स्टेटस ठेवले.

फ्लेक्स नजरेस पडला अन्...

पेट्रोलिंग करणाऱ्या पोलिसांच्या नजरेत फ्लेक्स आला. त्याची उंची कमी असल्याने पोलिसांना संशय आला. पोलिसांनी कागदपत्रे आणि नियुक्तिपत्राची चौकशी केली, तेव्हा ऋषिकेशची बोबडी वळली. तपासात हा सर्व प्रकार केवळ एक ‘दिखावा’ असल्याचे उघड झाले असून त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Fake Police Celebration: Banner, Sweets, Then Real Police Arrival!

Web Summary : A youth falsely claimed police selection with banners and sweets. Police investigated, exposing the charade motivated by marriage prospects and mother's happiness. He faces charges.
टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रPuneपुणेfraudधोकेबाजी