शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
2
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
3
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
4
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
5
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
6
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
7
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
8
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
9
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
10
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
11
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
12
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
13
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
14
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
15
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
16
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
17
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
18
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
19
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
20
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसाला पैसे मागणार्‍या लाचखोर लिपिकाला अटक

By admin | Updated: September 9, 2014 05:09 IST

पोलीस दलात कार्यरत कर्मचार्‍याची सुटी मंजूर करण्यासाठी २00 रूपयांची लाच मागणार्‍या गोंदियाच्या पोलीस अधीक्षक कार्यालयातील लिपिकावर लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवून अटक करण्यात आली.

गोंदिया : पोलीस दलात कार्यरत कर्मचार्‍याची सुटी मंजूर करण्यासाठी २00 रूपयांची लाच मागणार्‍या गोंदियाच्या पोलीस अधीक्षक कार्यालयातील लिपिकावर लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवून अटक करण्यात आली. सोमवारी (दि.८) ही कारवाई करण्यात आली.सविस्तर असे की, या प्रकरणातील तक्रारकर्त्या पोलीस कर्मचार्‍यास धार्मिक व वैयक्तिक कामासाठी आपल्या गावी जायचे असल्याने रजेची आवश्यकता होती. त्यांनी प्रभारी अधिकार्‍यांची स्वाक्षरी घेऊन १५ दिवसांच्या अजिर्त रजा मंजुरीचा अर्ज पोलीस अधीक्षक कार्यालयातील लिपीक अनिल बसू ग्यानचंदानी (४३) याच्याकडे दिला. तेव्हा ग्यानचंदानी याने त्यांना १५ सप्टेंबरपासून १५ दिवसांची रजा मंजूर करण्यासाठी २00 रूपयांची मागणी केली. पैसे मिळाल्याशिवाय रजेचा अर्ज स्वीकारणार नाही व रजा मंजूर करणार नाही, असे स्पष्ट सांगितले.त्यामुळे तक्रारकर्त्या कर्मचार्‍याने ३ सप्टेंबर रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात तक्रार नोंदविली. त्या तक्रारीच्या आधारे विभागाने पडताळणी करण्यासाठी पंचांना तक्रारकर्त्यासोबत ग्यानचंदानी यांच्या कार्यालयात पाठविले. त्यावेळीही ग्यानचंदानी याने पैशांची मागणी केल्याचे निष्पन्न झाल्याने पुढील कारवाईसाठी सापळा लावण्याचे ठरले. मात्र ग्यानचंदानीला शंका आल्याने त्याने तक्रारकर्त्याकडून पैसे स्वीकारले नाही. मात्र त्याने २00 रूपयांपेक्षा अधिक रकमेची मागणी करून ती लाच स्वीक ारण्याची तयारी दशर्विल्याने त्या आधारे ग्यानचंदानी याच्याविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यांतर्गत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.ही कारवाई पोलीस उपअधीक्षक दीनकर ठोसरे, पोलीस निरीक्षक प्रमोद घोंगे, शिवचरण पेठे, हवालदार दिवाकर भदाडे, गोपाल गिर्‍हेपुंजे, दीपक दत्ता, नायक राजेश शेंद्रे, योगेश उईके, शेखर खोब्रागडे, देवानंद मारबते, महिला शिपाई तनुजा मेश्राम यांनी केली. (शहर प्रतिनिधी)