शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
2
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
3
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
4
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
5
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
6
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
7
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
8
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
9
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
10
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
11
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
12
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
13
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
14
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
15
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
16
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
17
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
18
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
19
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
20
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
Daily Top 2Weekly Top 5

पर्यटकांना खुणावतोय डेस्टिनेशन गोवा

By admin | Updated: June 23, 2016 04:53 IST

गोव्यातील स्वच्छ व सुंदर समुद्र किनारे, महोत्सव, काजू, किल्ले, चर्च, जीवनशैली, संस्कृती पर्यटकांना भुरळ घालत आहे. भारतीय पर्यटकांसह परदेशी पर्यटकही मोठ्या संख्येने गोव्याला भेट देत आहेत.

वैभव गायकर,  पनवेलगोव्यातील स्वच्छ व सुंदर समुद्र किनारे, महोत्सव, काजू, किल्ले, चर्च, जीवनशैली, संस्कृती पर्यटकांना भुरळ घालत आहे. भारतीय पर्यटकांसह परदेशी पर्यटकही मोठ्या संख्येने गोव्याला भेट देत आहेत.पर्यटन क्षेत्र गोव्याच्या अर्थव्यवस्थेला दिशा देत आहे. गोव्यातील एकतृतियांश लोकसंख्या प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या पर्यटन क्षेत्रात कार्यरत आहे. स्थानिकांना हॉटेल व्यवसायामुळे चांगला रोजगार प्राप्त झाला आहे. देश-परदेशांतील पाच लाख पर्यटकांना सेवा पुरवली जात आहे. काही महिन्यांत ही संख्या किमान १० टक्क्यांनी वाढून सहा लाखापर्यंत जाणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. गोव्यातील स्वच्छ सुंदर समुद्र किनारे, पायाभूत सुविधांमुळे पर्यटक याठिकाणी आकर्षित होत आहेत. मागील तीन वर्षापासून पर्यटनाचा अधिक विकास झाला आहे. पर्यटकांसाठी गोवा पर्यटन मंत्रालयाने व्हाईट वॉटर रिव्हर राफ्टिंग सेवा, हॉट एअर बलून आदी उपक्रमांना गोवा सरकारतर्फे प्रोत्साहन दिले जात आहे. विशेष म्हणजे गोव्याला सध्या डेस्टिनेशन वेडिंग, इको टुरिझम, फेस्टिवल टुरिझम, योग आणि स्वास्थ्य टुरिझम, फॅशन आणि खाद्यपदार्थ टुरिझम आदीसाठी पसंती दिली जात आहे. समुद्र किनाऱ्यांवर सर्वात जास्त पर्यटक येतात. त्या अनुषंगाने संपूर्ण किनारपट्टीवर पहाटेपासून मध्यरात्रीपर्यंत ६०० सुरक्षा रक्षक नेमलेले आहेत. गोव्यातील सण व कार्निवल ग्रेप इस्केप्ड : ग्रेप इस्केप्ड हा भारतातील सर्वात मोठा वाईन महोत्सव आहे. तो गोवा आणि गोव्यातील जीवनशैलीचे लघु रूप मानला जातो. चविष्ट खाद्यपदार्थ, मनोरंजन यांनी हा महोत्सव परिपूर्ण असतो.कार्निवल - गोव्यात विविध प्रकारचे कार्निवल आयोजित केले जातात. देशभरात असे कार्निवल कुठेही पहावयास मिळत नाहीत. विविध रंग, पोशाख, नृत्य प्रकार यांचा अनुभव येथे घेता येतो. शिगमो, गोवा नारळ व काजू महोत्सव - नारळ आणि काजू महोत्सवात गोव्याची जीवनशैली प्रतिबिंबित होते.