शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
2
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
3
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
4
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
5
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
6
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
7
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
8
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
9
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
10
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
11
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
12
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
13
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
14
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
15
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
16
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
17
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
18
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
19
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
20
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

शिवस्मारकाविरोधात हायकोर्टात याचिका

By admin | Updated: January 8, 2017 00:29 IST

राज्यावर कोट्यवधी रुपयांचे ओझे आणि अनेक समस्या ‘आ’ वासून उभ्या असताना करदात्यांचे ३,६०० कोटी रुपये खर्च करून शिवस्मारक बांधण्याची गरज काय, असा थेट

मुंबई : राज्यावर कोट्यवधी रुपयांचे ओझे आणि अनेक समस्या ‘आ’ वासून उभ्या असताना करदात्यांचे ३,६०० कोटी रुपये खर्च करून शिवस्मारक बांधण्याची गरज काय, असा थेट प्रश्न प्रा. मोहन भिडे यांनी जनहित याचिकेद्वारे उपस्थित केला आहे. राज्यातील १२ कोटी जनतेच्या महत्त्वाच्या समस्यांकडे दुर्लक्ष करून बांधण्यात येणारे शिवस्मारक रद्द करण्यात यावे, अशी मागणी भिडे यांनी केली आहे. ३१ मार्च २०१६पर्यंत राज्यावर ३ लाख ५१ हजार कोटी रुपये कर्ज होते. या आर्थिक वर्षात हे कर्ज ४ लाख कोटी रुपये होण्याची शक्यता आहे. एवढे कर्जाचे ओझे असतानाही राज्य सरकार शिवस्मारकासाठी ३६०० कोटी रुपये खर्च करणार. कर्जाशिवाय राज्य सरकारपुढे अनेक समस्या ‘आ’ वासून उभ्या आहेत. १२ कोटी जनतेला मूलभूत सुविधा पुरविण्यास अपयशी ठरलेल्या सरकारने अशा प्रकारे सामान्य जनतेचे पैसे प्रकल्पासाठी खर्च करणे योग्य आहे का, असा प्रश्न भिडे-कपासी कॉमर्स क्लासेसचे प्राध्यापक मोहम भिडे यांनी जनहित याचिकेद्वारे उपस्थित केला आहे. ‘जगातील सर्वांत उंच स्वातंत्र्यदेवीच्या पुतळ्याला मागे टाकण्यासाठी गुजरात सरकारने सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा बांधण्याचा निर्णय घेतला. याही पुतळ्याला मागे टाकण्यासाठी राज्य सरकारने त्याहून उंच असा शिवाजी महाराजांचा पुतळा बांधण्याचा निर्णय घेतला. सर्वांत उंच पुतळे बांधण्याची ही स्पर्धा आहे का? या स्मारकामुळे पर्यावरणालाही हानी पोहोचणार आहे. त्यामुळे हे प्रस्तावित स्मारक रद्द करण्याचा आदेश सरकारला द्या; तसेच ही याचिका प्रलंबित असेपर्यंत प्रस्तावित प्रकल्पाला स्थगिती द्यावी, अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केली आहे. (प्रतिनिधी)