शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: "नरेंद्र मोदी हे दहशतवादी"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव...
2
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
3
हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा
4
जगाची ‘लाईफलाईन’ धोक्यात? मलक्काच्या मार्गावर अमेरिकेचा पहारा, चीनची वाढली धडधड!
5
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
6
Lori Deremer: देशावर युद्धाचं संकट, पण ट्रम्प सरकारची महिला मंत्री करत होती 'पूल पार्टी'
7
इराणची लेडी डॉन शमीम माफीला अमेरिकेत अटक, विमानतळावरच ठोकल्या बेड्या; प्रकरण काय?
8
Latest Marathi News LIVE Updates: चेन्नई सुपर किंग्जचा आयुष म्हात्रे दुखापतीमुळे IPL 2026 बाहेर
9
क्रिकेट इतिहासात शून्यावर बाद होणारा पहिला खेळाडू कोण? १४९ वर्षांपूर्वी नोंदवला गेला हा लाजीरवाणा विक्रम; कसा आला 'डक' शब्द? जाणून घ्या
10
खाडी देशांत युद्ध...! भारतीय पर्यटकांनी या देशांकडे वळविला आपला मोर्चा; उन्हाळ्यात तुम्ही कुठे जाणार?
11
धक्कादायक! रील बनवण्याची हौस जिवावर बेतली; बाईकवरून स्टंट करताना पडून ३ भावांचा मृत्यू
12
एकनाथ शिंदेंनी शब्द पाळला; पहलगाममध्ये आदिलच्या कुटुंबाला घर बांधून दिले, १२ लाख खर्च केले!
13
“IPLप्रमाणे राजकारणात बोली लागतात, जिकडे जास्त बोली, तिकडे लोक अधिक”; ठाकरेंचा रोख कुणाकडे?
14
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
15
Apple कडून वर्षाकाठी मिळतात ₹५२५ कोटी; टिम कुक यांची एकूण संपत्ती किती? आकडा ऐकून धक्का बसेल...
16
मध्यमवर्गीयांसांठी Hyundai स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणणार, ५००kmची रेंज अन् ढासू फीचर्स मिळणार; TATAचं टेन्शन वाढणार?
17
मोदींचा 'झाल मुरी'चा व्हिडीओ, ममता बॅनर्जी म्हणाल्या, "कोणाचा विश्वास बसेल का की, पंतप्रधानांच्या पाकिटामध्ये..."
18
"मला विराट कोहलीसारखा पार्टनर हवाय...", युजवेंद्र चहलसोबत डेटिंगच्या चर्चा सुरू असतानाच 'बिग बॉस' फेम शेफाली बग्गाचं वक्तव्य
19
"भारत विसरत नाही, मर्यादा ओलांडल्यास..."; पहलगाम हल्ल्याला वर्ष होण्याआधी PAK ला सूचक संदेश
20
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा प्रेग्नेंट; नवरा फरमान खानचा मोठा दावा, पोलीस पोहोचले पण...
Daily Top 2Weekly Top 5

प्रवाशांनो, समस्या असेल तर तक्रार करा!

By admin | Updated: August 16, 2014 02:27 IST

कोकण रेल्वे मार्गावरील ट्रेनमधून प्रवास करताना अनेक प्रवाशांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागते

मुंबई : कोकण रेल्वे मार्गावरील ट्रेनमधून प्रवास करताना अनेक प्रवाशांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागते. अशा वेळी समस्या सतावत असतानाही त्याची तक्रार प्रवाशांना रेल्वे प्रशासनाकडे करता येत नाही. प्रवाशांना सतावणारी ही समस्या पाहता तक्रार करण्यासाठी कोकण रेल्वेने एसएमएस सेवा १५ आॅगस्टपासून सुरु केली आहे. खानपान सेवा आणि टॉयलेटची व्यवस्था बरोबर नसणे, डब्यांमध्ये अस्वच्छता असणे, फेरीवाले, तृतीयपंथीयांकडून त्रास होणे या आणि अनेक कारणांमुळे प्रवाशांचा प्रवास त्रासदायक होत असतो. याचबरोबर प्रवाशांना स्थानकात असल्यास ट्रेन वेळेवर नसणे, पाण्याची आणि खाद्यपदार्थांच्या स्टॉल्सची व्यवस्था नसणे अशा समस्यांनाही तोंड द्यावे लागते. याबाबत स्टेशन मास्तरकडे तक्रार नोंदवल्यास ती तक्रार रेल्वेच्या वरिष्ठ पातळीवर पोहोचेलच असे नाही. तसेच त्याचे निराकरण त्वरित होणेही अशक्य असल्याचे दिसून येते. प्रवाशांच्या या सर्व समस्या पाहता कोकण रेल्वेने प्रवाशांच्या तक्रार निवारणासाठी या मार्गावर एसएमएस सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार ही सेवा १५ आॅगस्टपासून कार्यान्वित करण्यात आली आहे. त्यासाठी ९००४४७०७० या मोबाईल नंबर प्रवाशांसाठी उपलब्ध करण्यात आला आहे. प्रवाशांनी पाठवलेल्या एसएमएसची दखल कोकण रेल्वेच्या बेलापूर, नवी मुंबईस्थित कंट्रोल रुममध्ये २४ तास घेतली जाणार असल्याचे कोकण रेल्वेच्या मुख्य जनसंपर्क अधिकारी वैशाली पतंगे यांनी सांगितले. या नंबरवर फक्त एसएमएस पाठवण्याची सोय असून फोन करुन बोलता येणार नसल्याचे त्यांनी सांगितले. या क्रमांकावर प्रवाशांची तक्रार आल्यास तात्काळ संबंधित विभागाला त्याची माहीती दिली जाईल आणि प्रवाशाच्या समस्येचे निराकरण केले जाईल, असे कोकण रेल्वे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. (प्रतिनिधी)