निवडणूकीबाबत पक्ष निर्णय घेईल - राणे

By Admin | Updated: September 4, 2014 00:55 IST2014-09-04T00:55:46+5:302014-09-04T00:55:46+5:30

कुडाळ-मालवणमधून निवडणूक लढविण्याबाबत पक्ष निर्णय घेईल. मात्र, 25 वर्षात जिल्ह्यात केलेल्या कामांचे आपल्याला म्हणावे तसे फळ मिळाले नाही.

The party will decide on the issue - Rane | निवडणूकीबाबत पक्ष निर्णय घेईल - राणे

निवडणूकीबाबत पक्ष निर्णय घेईल - राणे

मालवण : कुडाळ-मालवणमधून निवडणूक लढविण्याबाबत पक्ष निर्णय घेईल. मात्र, 25 वर्षात जिल्ह्यात केलेल्या कामांचे आपल्याला म्हणावे तसे फळ मिळाले नाही. यामुळे विधानसभेच्या निवडणुकीत उभे राहायचे की नाही हे मला ठरवावे लागेल, असे उद्योगमंत्री नारायण राणो म्हणाले.
येथील नीलरत्न निवासस्थानी झालेल्या पत्रकार परिषदेत मंत्री नारायण राणो बोलत होते. नरेंद्र मोदी लोकशाही भारताचे पंतप्रधान वाटत नाहीत, अशी टीका करताना राणो यांनी काँग्रेसमुक्त भारत निर्माण करायला निघालेल्या मोदींनी त्यांच्या पक्षाची सत्ता असलेल्या राज्यांतील भ्रष्टाचार अगोदर घालवून दाखवावा, असा टोलाही लगावला. 
जिल्ह्यातील दीपक केसरकर, प्रमोद जठार, वैभव नाईक यांच्यासह विजय सावंत यांच्यावरही राणोंनी टीका केली. विजय सावंत यांना पक्षात किंमत नाही. त्यांना कणकवली येथून उमेदवारी द्यायचे सोडूनच द्या. त्यांची साधी उमेदवारीसाठी मुलाखतही घेण्यात आली नाही. वाळू, सिमेंटच्या कामांतून चार पैसे सुटतात का, हे पाहणा:यांना निवडून द्यायचे की विकास करणा:यांना, हे जिल्हावासीयांनी ठरविले पाहिजे, असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)

 

Web Title: The party will decide on the issue - Rane