शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
3
नराधम अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
4
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
5
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दशहत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
6
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
7
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
8
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
9
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
10
सांगली हादरली! पत्नीला घरात ठेवण्याच्या हट्टापायी आईची हत्या; वडील घरी नसताना मुलाचे क्रूर कृत्य
11
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
12
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
13
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
14
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
15
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला आमरसपुरीचे जेवण आणि पितरांना ठेवतात नैवेद्य; काय आहे प्रथा? वाचा 
16
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
17
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
18
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
19
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
20
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
Daily Top 2Weekly Top 5

पोपट मेलाच आहे; पण सांगायचे कुणी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2017 04:40 IST

नाशिक शहरात सन २०१२च्या महापालिका निवडणुकीच्या वेळीच सेना-भाजपा युतीचा पोपट मेला आहे, पण आता २०१७ च्या निवडणुकीतही तो थडग्यातून पुन्हा उकरून

धनंजय वाखारे / नाशिक नाशिक शहरात सन २०१२च्या महापालिका निवडणुकीच्या वेळीच सेना-भाजपा युतीचा पोपट मेला आहे, पण आता २०१७ च्या निवडणुकीतही तो थडग्यातून पुन्हा उकरून काढत अर्धमेला झाला आहे, निपचित पडलेला आहे, असे सांगत युतीबाबत सेना-भाजपात एकमेकांना झुलवत ठेवले जात आहे. राज्यस्तरावर युतीबाबत खलबते सुरू असली तरी नाशिकमध्ये महापालिका निवडणुका स्वबळावर लढण्यास सेना-भाजपा ठाम आहे. फक्त युतीच्या या साऱ्या चर्चेत पोपट कधीच मेला आहे, हे सांगायचे कुणी, हा खरा प्रश्न आहे. २०१२ मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत युती तोडण्यास भाजपानेच पुढाकार घेतला होता. त्या वेळी १२२ ठिकाणी उमेदवार देताना सेना-भाजपा या दोन्ही पक्षांची दमछाक झाली होती. निवडणुकीत भाजपाने आपल्या १४ जागा राखल्या होत्या, तर सेनेचे संख्याबळ कमी होऊन ते २२ वर आले होते. त्यानंतर गेल्या पाच वर्षांत सेना-भाजपातून विस्तव गेला नाही आणि एकमेकांना विरोध करण्यातच उभयतांनी शक्ती खर्च केली. आता २१ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या महापालिका निवडणुकीसाठी सेना - भाजपाने स्वबळावर लढण्याची पूर्ण तयारी चालविली आहे. स्थानिक पातळीवर युतीच्या वावड्या उठविल्या जात असल्या तरी दोन्ही पक्षांचे पदाधिकारी मात्र कोणत्याही परिस्थितीत युती करायची नाही, या मुद्द्यावर ठाम आहेत. शहरात गेल्या पाच वर्षांत १२२ पैकी तब्बल ४२ नगरसेवकांनी पक्षांतरे केलेली आहेत आणि महापालिकेच्या इतिहासात ही सर्वात मोठ्या प्रमाणावर पक्षांतराची लाट ठरली आहे. त्यात शिवसेनेत तब्बल २४, तर भाजपात १८ नगरसेवकांनी प्रवेश केला आहे. त्यामुळे यातील काही अपवाद वगळता सर्वांना तिकिटे देण्याचे आव्हान उभयतांपुढे आहे. यदाकदाचित वरिष्ठ स्तरावरून युतीचा संदेश आल्यास सेना-भाजपात तिकिटावरून मोठी दुफळी माजण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे स्थानिक पदाधिकारी व इच्छुकांकडूनही युती न होण्याचीच मानसिकता दर्शविली जात आहे.