नगरपालिकेने २०१८-१९ ते २०२१-२२ या कालावधीसाठी मालमत्ता कर वाढविण्याचा निर्णय घेतला. हा वाढीव कर मालमत्ताधारकांना जाचक ठरत आहे. पालिकेने सभागृहात २० ते ३० टक्के करवाढीचा निर्णय घेतला. वाढीव करामुळे सामान्य नागरिकांची आर्थिक फरपट होत आहे. ...
शेतकऱ्यांनी गुलाबी बोंडअळीबाबत जागृत राहून निरीक्षण करावे, एकात्मिक कीड व्यवस्थापनात गुलाबी बोंडअळीग्रस्त फुले तोडून अळीसह नष्ट करावी. एकरी पाच ते सहा कामगंध सापळे लावावे. निंबोळी अर्काची फवारणी करावी. पात्यांच्या अवस्थेपासून एकरी तीन ट्रायकाकार्डचा ...
यवतमाळचे जनरल मॅनेजर सुहास ढोले यांनी बोरीअरब गाठून शेतकऱ्यांशी चर्चा केली. त्यांना १५ दिवसात कर्ज देण्याची ग्वाही दिली. इतर मागण्याही तातडीने निकाली काढण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले. ...
२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागल्यानंतरही गेली पाच वर्षे शिवाजीराव मोघे आपल्या आर्णी विधानसभा मतदारसंघात कमालीचे सक्रिय होते. ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कुलसचिव तसेच परीक्षा व मूल्यमापन संचालकपदी नेमकी कुणाची निवड झालेली आहे ही बाब अद्यापही गुलदस्त्यात आहे. गुरुवार किंवा शुक्रवारी यासंदर्भात अधिकृत घोषणा होऊ शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. ...
शहरातील प्रमुख मार्गासह अंतर्गत मार्गावरही जनावरे ठिय्या मांडतात. यामुळे मूर्ती बघण्यासाठी जाणाऱ्या गणेश भक्तांच्या मार्गात अडथळा निर्माण झाल्याने अपघाताच्या घटना घडत आहेत. ...
देशातील विविध बँकांमध्ये मागील आर्थिक वर्षामध्ये थोडेथोडके नव्हे ५९ हजारांहून अधिक घोटाळे झाले. घोटाळ्यांची रक्कम ही ६७ हजार कोटींहून अधिक होती.माहितीच्या अधिकारातून ही धक्कादायक बाब समोर आली आहे. ...
शहरात तीन ठिकाणी रस्त्यांवर चिंधी बाजार भरतो. या व्यवसायातील लोकांना हक्काच्या जागेत दुकाने लावता यावीत, यासाठी महापालिका त्यांना जागा उपलब्ध करणार आहे. ...
५० हजार रुपये वसुली करून एकतर्फी कारवाई करणाऱ्या तहसील ठाण्याच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची तक्रार पोलीस आयुक्त डॉ. भूषण कुमार उपाध्याय यांच्याकडे करण्यात आली आहे. ...