शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
4
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
5
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
6
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
7
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
8
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
9
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
10
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
11
आजचा अग्रलेख: महिला आरक्षणाचा राजकीय खेळ
12
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
13
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
14
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
15
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
16
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
17
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
18
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
19
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
20
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
Daily Top 2Weekly Top 5

पदे भरण्यासाठी नियमबाह्य पद्धत

By admin | Updated: October 13, 2015 03:08 IST

रुग्णांच्या सेवेमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत असलेल्या परिचर्या आणि परिचारिकांना शिक्षण देणाऱ्या परिचर्या (नर्सिंग) महाविद्यालयातील वरिष्ठ दर्जाची रिक्त पदे नियमबाह्य

जमीर काझी, मुंबईरुग्णांच्या सेवेमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत असलेल्या परिचर्या आणि परिचारिकांना शिक्षण देणाऱ्या परिचर्या (नर्सिंग) महाविद्यालयातील वरिष्ठ दर्जाची रिक्त पदे नियमबाह्य पद्धतीने भरण्याचा घाट वैद्यकीय शिक्षण विभागातील काही अधिकाऱ्यांकडून घातला जात आहे. राज्यातील चार ठिकाणच्या नर्सिंग कॉलेजमधील प्राचार्य, उपप्राचार्य, प्राध्यापक आणि अधिव्याख्यातांची रिक्त पदे सेवाज्येष्ठता व अनुभवाच्या पात्रतेचे निकष डावलून विभागाकडून परीक्षा घेऊन भरण्यासाठीचा नवा प्रस्ताव तयार करण्यात येत असल्याचे विभागातील सूत्रांकडून सांगण्यात आले.विशेष म्हणजे एक महिन्यापूर्वी अशा पद्धतीने पदभरती करण्याचा प्रस्ताव मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांनी फेटाळून लावला होता. असे असताना पुन्हा काही अधिकारी तात्पुरता बदल करीत फेरप्रस्ताव बनविण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यामुळे अनुभवी व सेवा ज्येष्ठ परिचर्यांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण होत आहे.मुंबईतील जे.जे. हॉस्पिटल परिसरासह औरंगाबाद, पुणे व नागपूर या ठिकाणी असलेल्या शासनाच्या परिचर्या महाविद्यालयांत पदविकाऐवजी बी.एस्सी (नर्सिंग) अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारकडून पाच वर्षांपूर्वी घेण्यात आला. त्यासाठीची आवश्यक असलेली अनेक पदेही निर्माण करण्यात आली. मात्र अद्यापपर्यंत ती भरण्यात आलेली नाहीत. वास्तविक, भारतीय परिचर्या परिषद (आयएनसी) किंवा विद्यापीठाच्या मानकानुसार पदाची भरती होणे आवश्यक असताना काँग्रेस आघाडी सरकारच्या उदासीन धोरणामुळे त्याकडे दुर्लक्षच झाले. त्यामुळे युती सरकारने ही पदे भरण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याची सूचना केल्यानंतर वैद्यकीय शिक्षण विभागाकडून घाईघाईने त्याबाबतचा प्रस्ताव बनवून मुख्य सचिवांकडे सादर करण्यात आला. त्यासाठीचे सेवा प्रवेश नियम अस्तित्वात नसल्याचे दर्शवित विभागांतर्गत मर्यादित परीक्षा घेऊन भरती करण्याचे त्यामध्ये सुचविण्यात आलेले होते. वास्तविक, ही पदे निर्माण झाली त्या वेळीच नवीन प्रवेश नियम बनविणे आवश्यक असले तरी १९९०पासून उपलब्ध असलेल्या नियमांच्या धर्तीवर भरती करणे आवश्यक होते, मुख्य सचिव क्षत्रिय यांच्या निदर्शनास हा प्रकार आल्यानंतर त्यांनी विभागाकडून सादर केलेला प्रस्ताव नामंजूर करत परत पाठविला. त्यानंतरही या पद्धतीने भरतीसाठी प्रयत्नशील असलेल्या काही अधिकाऱ्यांनी सेवानियमांच्या प्रस्तावात तात्पुरते बदल करीत विभागाकडून परीक्षा घेऊन भरती करण्यासाठी फेरप्रस्ताव बनविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मर्जीतील अधिकाऱ्यांना पदोन्नती मिळून या रिक्त पदावर भरती होण्यासाठी हे प्रयत्न सुरू असल्याचे विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. दरम्यान, याबाबत प्रतिक्रिया घेण्यासाठी वैद्यकीय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याशी फोन व मेसेज पाठवून संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र ते उपलब्ध झाले नाहीत.