शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
3
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
4
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
5
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
6
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
7
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
8
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
9
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
10
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
11
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
12
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
13
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
14
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
15
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
16
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
17
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
18
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
19
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
20
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीने इमारतीतून मारली उडी
Daily Top 2Weekly Top 5

"रोज सूर्योदयापूर्वीच उगवणारा आमचा तेजस्वी सूर्य अस्ताला गेला", रोहित पवारांनी पहिल्यांदाच व्यक्त केल्या भावना

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2026 19:10 IST

अजित पवारांच्या निधनाने पवार कुटुंबीयांवर मोठा आघात झाला. राज्याचे उपमुख्यमंत्री असलेले अजित पवार कुटुंबासाठी महत्त्वाचा आधार होते. त्यांनाच काळाने हिरावून नेले. त्यांच्या निधनानंतर रोहित पवारांनी आपल्या भावनांवा वाट मोकळी करून देत सर्वांचे आभार मानले आहे. 

बारामतीत उतरण्यापूर्वीच उपमुख्यमंत्री अजित पवारांना काळाने हिरावून घेतले. अजित पवारांच्या जाण्याने पवार कुटुंबीयांना मोठा हादरा बसला. संपूर्ण पवार कुटुंबाबरोबरच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, कार्यकर्ते शोकात बुडाले आहेत. बारामतीतील विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या निधनानंतर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी पहिल्यांदाच आपल्या भावना व्यक्त करत सर्वांचे आभार मानले. 

अजित पवारांवर गुरुवारी (२९ जानेवारी) दुपारी बारामतीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी राज्यभरातून आलेल्या हजारो लोकांनी अजित पवारांना अखेरचा निरोप दिला. अपघात आणि अजित पवारांच्या निधनांची बातमी कळाल्यापासूनच लोकांची बारामतीच्या दिशेने रिघ सुरू झाली होती. सकाळी बारामती प्रतिष्ठान अलोट गर्दीने भरून गेले होते. राज्यभरातून उपस्थित असलेल्या आणि कॉलवरून पवार कुटुंबाच्या दुःखात सहभागी झालेल्यांचे रोहित पवारांनी आभार मानले. 

रोज ध्यासाने उगवणारा सूर्य अस्ताला गेला   अजित पवारांवर अंत्यसंस्कार करण्यात आल्यानंतर रोहित पवारांनी एक पोस्ट केली. ते म्हणाले, "महाराष्ट्रावर विकासाचा प्रकाश पाडण्याच्या ध्यासाने रोज सूर्योदयापूर्वीच उगवणारा आमचा तेजस्वी सूर्य अस्ताला गेला! या सूर्याला अखेरचा निरोप देण्यासाठी आणि पवार कुटुंबाला आधार देण्यासाठी आज बारामतीत राज्य आणि देशभरातून आलेले अजितदादांवर प्रेम करणारे सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सामान्य माणसं यांचं ऋण पवार कुटुंब कदापि विसरणार नाही", अशा भावना रोहित पवारांनी व्यक्त केल्या आहेत. 

विमान अपघाताचा तपास एएआबीकडे

अजित पवार यांच्या विमानाचा उतरत असताना अपघात झाला. त्यात अजित पवारांसह पाच जणांचा मृत्यू झाला. बारामतीत झालेल्या या विमान अपघाताबद्दल अनेकांकडून शंका उपस्थित करण्यात आल्या. त्याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्र्यांना पत्र पाठवले आणि या अपघाताची चौकशी करण्याची मागणी केली.

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या पत्राची दखल घेत केंद्र सरकारकडून तातडीने कार्यवाही करण्यात आली आहे. केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री राममोहन नायडू यांनी मुख्यमंत्री फडणवीसांच्या पत्राला उत्तर दिले आहे. नायडू यांनी पत्रात म्हटले आहे की, बारामतीजवळ झालेल्या दुर्दैवी विमान अपघाताबद्दल तुमचे २९ जानेवारी २०२६ रोजीचे पत्र मला मिळाले.

या दुर्दैवी घटनेत झालेल्या जीवितहानीबद्दल मी तीव्र दुःख व्यक्त करतो. केंद्र सरकार आणि नागरी विमान वाहतूक मंत्रालय या घटनेकडे अत्यंत गांभीर्याने पाहत आहे. नियमाप्रमाणे विमान अपघात तपासणी ब्युरो (AAIB) यांनी AAIB नियमांतील संबंधित तरतुदींनुसार तपास सुरू केला आहे. AAIB आणि DGCA यांच्या पथकांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली असून ‘ब्लॅक बॉक्स’ सुरक्षितरित्या ताब्यात घेतला आहे आणि तो तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे, असे त्यांनी मुख्यमंत्री फडणवीसांना पत्राद्वारे कळवले आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Rohit Pawar expresses grief: 'Our radiant sun has set'

Web Summary : Ajit Pawar's death deeply saddened his family and NCP members. Rohit Pawar expressed gratitude for the support received from across the state and country. A plane crash investigation has been launched.
टॅग्स :Ajit Pawarअजित पवारRohit Pawarरोहित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसPlane Crashविमान दुर्घटनाDeathमृत्यू