विरोधी पक्षनेतेपदाचा निर्णय 6 ऑगस्टला?

By Admin | Updated: July 23, 2014 00:36 IST2014-07-23T00:36:54+5:302014-07-23T00:36:54+5:30

सोमवारी झालेल्या सुनावणीदरम्यान महापौर आणि सचिवांना येत्या 8 दिवसांत सत्यप्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

Opposition leader's decision on August 6? | विरोधी पक्षनेतेपदाचा निर्णय 6 ऑगस्टला?

विरोधी पक्षनेतेपदाचा निर्णय 6 ऑगस्टला?

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेतील विरोधी पक्षनेतेपदाचा वाद मुंबई उच्च न्यायालयात असून सोमवारी  झालेल्या सुनावणीदरम्यान महापौर आणि सचिवांना येत्या 8 दिवसांत सत्यप्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. पुढील सुनावणी 6 ऑगस्ट रोजी होणार असून या वेळी निर्णय होण्याची दाट शक्यता आहे. 
विरोधी पक्षनेतेपद मनसेकडे असताना 31 मे 2क्14 च्या महासभेत महापौर कल्याणी पाटील यांनी हे पद काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला बहाल करून या पदावर काँग्रेसचे सदस्य विश्वनाथ राणो यांची नेमणूक झाल्याचे जाहीर केले. कोणत्या नियमांच्या आधारे हा निर्णय घेतला, याचा खुलासा करावा, अशी मागणी मनसेच्या सदस्यांनी सचिव सुभाष भुजबळ यांच्याकडे केली़ परंतु, त्यांनी चुप्पी साधणो पसंत केले होत़े 
महापौर पाटील यांची कृती बेकायदेशीर असल्याचा आरोप मनसेने तेव्हा केला होता. यावर 19(अ) प्रमाणो विरोधी पक्षनेतेपद जाहीर करण्याचे अधिकार महापौरांना आहेत, असे स्पष्ट करीत महापौर कल्याणी पाटील यांनी मनसेचे आरोप फेटाळले होते.
दरम्यान, माजी विरोधी पक्षनेते तथा मनसेचे सदस्य मंदार हळबे यांनी महापौरांच्या निर्णयाला उच्च न्यायालयात 19 जून रोजी आव्हान दिल़े त्यांनी आपल्या याचिकेत महापौरांसह पालिका आयुक्त, सचिव, विद्यमान विरोधी पक्षनेते, कोकण विभागीय आयुक्त आणि महाराष्ट्र शासन यांना प्रतिवादी केले आहे. 
पहिली सुनावणी 23 जून रोजी झाली, त्या वेळी 14 जुलैर्पयत सर्वाना सत्यप्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. परंतु, महापौर आणि सचिव यांनी प्रतिज्ञापत्र सादर केले नव्हत़े 
यावर सोमवारी झालेल्या सुनावणीदरम्यान येत्या 8 दिवसांत प्रतिज्ञापत्र सादर करावे, असे अंतिम आदेश न्यायालयाने दिले असून पुढील सुनावणी 6 ऑगस्टला होणार आहे. (प्रतिनिधी)
 

 

Web Title: Opposition leader's decision on August 6?