शहरं
Join us  
Trending Stories
1
"आक्षेप घेणाऱ्यांनी हे पुस्तक वाचलंय का?"; विनाकारण वाद करु नका म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांचे खडे बोल
2
खासगी शाळांमध्ये आता मराठी शिकवणे बंधनकारक; नियम मोडणाऱ्या शाळेला बसणार दणका
3
पाकिस्तानकडे ५-६ दिवस पुरेल एवढेच कच्चे तेल! भारताकडे मागणार? अर्थमंत्री हतबल, जनतेत घबराट
4
'खरातच्या सल्ल्यानुसार बारामतीमधील एका नेत्याने केली होती अजितदादांच्या घराबाहेर पूजा, रोहित परावांचा मोठा गौप्यस्फोट
5
“प्रियंका चोप्रामुळे राघव चड्ढा यांचा भाजपात प्रवेश”; नवज्योत सिंग सिद्धू यांच्या पत्नीचा मोठा दावा
6
धक्कादायक! नाशिक, अमरावतीसारखा प्रकार कोल्हापुरात; तरुणींचे Video बनवून ब्लॅकमेल, तरुणाला अटक
7
Budh Pradosh 2026: कर्जमुक्ती आणि मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी २९ एप्रिलला न चुकता करा 'बुध प्रदोष' व्रत
8
Top Marathi News LIVE Updates: १ मेपासून मराठीची मोहीम सुरूच राहणार; मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
9
तुमची गुप्त ऊर्जा जागृत आहे का? राशीनुसार करा ‘हे’ साधे-सोपे उपाय; नशिबाची साथ-भरघोस लाभ!
10
अजितदादांच्या अपघातादिवशीच विमान कंपनीला ९ कोटींचे बक्षीस; रोहित पवारांचे खळबळजनक आरोप
11
भारत लष्करी खर्चात जगात पाचवा ठरला! शेजारी पाकिस्तान जवळपासही कुठेच नाहीय..., चीन मात्र...
12
गोलsss... पंतप्रधान नरेंद्र मोदी सिक्कीमच्या तरुणांसोबत खेळले फुटबॉल, PHOTOS ची रंगली चर्चा
13
वाढदिवसासाठी Reel तयार करण्याच्या नादात युवकाने भलताच उद्योग केला; शेवटी हातात पडल्या बेड्या
14
Adhar Card : मोठा बदल! आता आधार कार्ड तुमचे वय सिद्ध करणार नाही, तुम्हाला जन्मतारखेचा पुरावा म्हणून 'ही' कागदपत्रे दाखवावी लागणार
15
कलमा वाचता येतो का? विचारले अन् सुरक्षा रक्षकांवर चालवला चाकू; मीरा रोडच्या हल्ल्यात 'लोन वुल्फ'चा संशय
16
Robert Kiyosaki Prediction: रॉबर्ट कियोसाकी यांची २०२६-२७ मध्ये मोठ्या आर्थिक संकटाची भविष्यवाणी; भारतीय गुंतवणूकदारांनी काय करावं?
17
‘RTE’ प्रवेश! पसंतीच्या शाळेसाठी पालकांची कोंडी; ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ, तरीही संभ्रम कायम
18
तुमच्या छोट्याशा बाल्कनीला, खिडकीला द्या 'ग्रीन टच'; कमी जागेत बाग फुलवण्याच्या 'मास्टर ट्रिक'
19
दाऊदला मोठा झटका! जवळचा सहकारी 'सलीम डोला' तुर्कस्तानमधून जेरबंद; भारतीय गुप्तचर यंत्रणांची कारवाई
20
हृदयद्रावक! IPL सामना पाहून घरी परतणाऱ्या २ भावांवर काळाचा घाला; 'हिट अँड रन'मध्ये मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

‘ज्युवेनाइल जस्टिस’मधील बदलाला विरोध

By admin | Updated: May 14, 2015 02:26 IST

ज्वुवेनाइल जस्टिस अ‍ॅक्टमध्ये मुलांचे वय १८ वर्षांवरून १६ वर्षे करण्याच्या प्रस्तावित बदलाला विविध सामाजिक संस्थांनी कडाडून विरोध केला आहे.

मुंबई : ज्वुवेनाइल जस्टिस अ‍ॅक्टमध्ये मुलांचे वय १८ वर्षांवरून १६ वर्षे करण्याच्या प्रस्तावित बदलाला विविध सामाजिक संस्थांनी कडाडून विरोध केला आहे. १८ वर्षांपर्यंत मुलांची शारीरिक आणि मानसिक वाढ पूर्णपणे झालेली नसते. प्रस्तावित बदलांमुळे मुलांच्या मानसिक विकासावर आघात होऊन सामाजिक व्यवस्थेवर एकप्रकारे दबाव येईल, असा आरोप मुंबई वर्किंग ग्रुप आॅन ज्वुवेनाइल जस्टिस या सामाजिक संस्थेसाठी काम करणाऱ्या डॉ. हरीश शेट्टी यांनी केला आहे.आॅल इंडिया एसोसिएशन आॅफ वूमनच्या अध्यक्षा डॉ. रितू दिवाण या वेळी म्हणाल्या की, घटनेने मतदानाचा अधिकार बजावण्यासाठी १८ वर्षांची अट घातली आहे. तर सरकारने वाहन चालवण्याचा परवाना देण्यासाठी १८ वर्षे पूर्ण असल्याचा नियम ठेवला आहे. तर मग ज्वुवेनाइल जस्टिस अ‍ॅक्टमध्ये मुलांच्या वयाबाबत वयोमर्यादा १८हून कमी करण्यामागील कारणच काय, असा प्रश्न दिवाण यांनी उपस्थित केला.संस्थेच्या म्हणण्यानुसार, निर्भया अत्याचार प्रकरणी मुख्य आरोपीचे वय १८ वर्षापेक्षा कमी असल्याने त्याला अपेक्षित शिक्षा ठोठावता आली नाही. दरम्यान, कोणताही गुन्हा केलेल्या १६ वर्षांखालील आरोपींना जास्तीत जास्त ३ वर्षांपर्यंतच्या शिक्षेची तरतूद आहे. त्यामुळे मनेका गांधी यांनी थेट लोकसभेमध्ये ज्वुवेनाइल जस्टिस अ‍ॅक्टमध्ये बदल करण्याची मागणी केली. भाजपा सरकारकडे बहुमत असल्याने कायद्यात बदल करण्याचे विधेयकही तात्काळ संसदेत मंजूर करण्यात आले. येत्या दोन दिवसांत या विधेयकावर राज्यसभेत विचारविनिमय होण्याची शक्यता आहे. परिणामी राज्यसभेत या विधेयकाला मंजुरी देऊ नये, अशी मागणी बालकांच्या हक्कांसाठी कार्यरत असलेल्या संस्थांनी केली आहे.